हैदराबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सातवा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. अभिषेक शर्मा, इशान किशन आणि ट्रॅविस हेड परतल्यावर हेन्री क्लासेन याने आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून दिली. पण प्रिन्स यादवच्या षटकात तो कमनशिबी ठरला. रन आउट होऊन त्याला माघारी परतावे लागले. त्याने १७ चेंडूत २७ धावा केल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेमकं काय घडलं?
ट्रॅविस हेडच्या रुपात सनरायझर्सच्या संघानं ७६ धावांवर तिसरी विकेट गमावली. त्यानंतर नितीश कुमार रेड्डी आणि हेन्री क्लासेन या जोडीनं संघाचा डाव सावरला. ही जोडी सेट होतीये असं वाटत असताना हैदराबादच्या डावातील १२ व्या षटकात क्लासेनच्या रुपात हैदराबादला मोठा धक्का बसला. या षटकातील प्रिन्स यादवच्या षटकात नितीश रेड्डीनं चेंडू थेट गोलंदाजाच्या दिशेनं मारला. यावेळी प्रिन्स यादवनं झेल घेण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या मनगटावर लागून स्टंपवर आदळला. नॉन स्ट्राइकवर असलेला क्लासेन क्रीज बाहेर असल्यामुळे त्याच्यावर रन आउट होण्याची नामुष्की ओढावली.
IPL 2025 SRH vs LSG : शार्दुल ठाकूरचा दे धक्का शो! अभिषेकसह इशानला बॅक टू बॅक धाडलं तंबूत
क्रिकेटच्या मैदानात अनेकदा अशा घटना पाहायला मिळतात. पण क्लासेन बद्दल जे घडलं ते खूपच विचित्र होते. क्रिकेटच्या मैदानात स्ट्राइकवर असलेल्या फलंदाजाने अगदी स्टंपच्या दिशेनं मारलेल्या चेंडूवर अशा प्रकारे रन आउट होण्याचा धोका अधिक असतो. पण हेन्री क्लासेन ज्या पद्धतीने आउट झाला तसे याआधी कदाचित कुणीच विकेट फेकली नसेल. कारण नितीश कुमार रेड्डीने मारलेला फटका काही सरळ रेषेत नव्हता. तो स्टंपपासून बराच लांब होता. प्रिन्स यादवनं हा कॅच घेण्याचा प्रयत्न केला अन् चेंडू काही त्याच्या हातत बसला नाही. हाताच्या मनगटावर लागून चेंडू नेमका यष्टीवर जाऊन आदळला. हेन्री क्लासेन याने तो चेंडू स्टंपकडे येईल ही कल्पनाच केली नसेल. पण घडलं ते अजब गजबच. फॉलो थ्रूमध्ये गोलंदाजाच्या हाताला चेंडू लागून सर्वात अनलकी ठरलेल्या खेळाडूंपैकी क्लासेन एक ठरला.
Web Title: IPL 2025 SRH vs LSG Prince Yadav Drops Nitish Kumar Reddy But Gets Heinrich Klaasen Unluckiest Run Out Ever At Non Striker's End Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.