आयपीएलच्या १८ व्या हंगामात लखनौच्या ताफ्यातून निकोलस पूरनच्या भात्यातून सलग दुसरे अर्धशतक आल्याचे पाहायला मिळाले. सनरायझर्स हैदराबादच्या संघानं दिलेल्या १९१ धावांचा पाठलाग करताना कॅरेबियन स्टारनं १८ चेंडूत अर्धशतक साजरे केले. यंदाच्या आयपीएल हंगामातील ही सर्वात जलद अर्धशतकी खेळी ठरली. लखनौ सुपर जाएंट्स्या ताफ्यातून खेळताना त्याच्या भात्यातून आलेली ही दुसऱ्या क्रमांकाची जलद अर्धशतकी खेळी आहे. याआधी २०२३ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात त्याने १५ चेंडूत अर्धशतक साजरे केले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
निकोल पूरनची आणखी एक वादळी खेळी
Unluckiest Run Out Ever: नितीश कुमार रेड्डीचा कॅच सुटला, पण नॉन स्ट्राइकवर क्लासेन फसला!
पहिल्या डावातही ७० पेक्षा अधिक धावा
पहिल्या सामन्यातही ठोकल्या होत्या ७० पेक्षा अधिक धावा दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात २०० पेक्षा अधिक धावांचे टार्गेट सेट करतानाही निकोलस पूरनच्या खात्यातून मोठी खेळी पाहायला मिळाली होती. या सामन्यात त्याने ३० चेंडूत ६ चौकार आणि ७ षटकाराच्या मदतीने ७५ धावा केल्या होत्या. पहिल्या दोन सामन्यानंतर निकोलस पूरनन याने आपल्या खात्यात १४५ धावा जमा केल्या असून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो अव्वलस्थानावर पोहचला आहे.