IPL 2025 SRH vs LSG Lord Shardul Thakur Gets Two Massive Wickets : आयपीएल स्पर्धेतील हैदराबादच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात शार्दुल ठाकूरनं लखनौच्या संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. सनरायझर्स हैदराबादच्या डावातील तिसऱ्या आणि आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकात शार्दुल ठाकूरनं अभिषेक शर्माला तंबूत धाडत पहिली विकेट आपल्या नावे केली. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या शतकवीर इशान किशनलाही त्याने आल्या पाऊली माघारी धाडले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धक्क्यावर धक्का!
लखनौ संघाचा कर्णधार रिषभ पंतनं टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर पहिल्यांदा गोलंदाजी करताना शार्दुल ठाकूर यानेच पहिले षटक टाकले. स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हैदराबादच्या सलामी जोडीसमोर तो कशी गोलंदाजी करणार त्यावर सर्वांच्या नजरा होत्या. पहिल्या षटकात फक्त १ चौकार देत त्याने चांगली सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या षटकात त्याने बॅक टू बॅक विकेट घेत हैदराबादच्या संघाला धक्क्यावर धक्का दिला.
Lord Shardul Thakur : 'अनसोल्ड' राहिला, मग किंमत मिळाली अन् त्याच्यातील हिंमतही दिसली! आता...
शतकवीर इशान किशनवर गोल्डन डकची नामुष्की
शार्दुल ठाकूरनं आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर आखूड टप्प्याच्या चेंडूवर अभिषक शर्माच्या रुपात महत्त्वपूर्ण विकेट घेतली. तो ६ चेंडूत ६ धावा करून निकोलस पूरनच्या हाती झेल देऊन माघारी फिरला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या इशान किशनवर तर या सामन्यात गोल्डन डकची नामुष्की ओढावली. तो आला अन् लेग स्टंपच्या बाहेरुन जाणारा शार्दुल ठाकूरचा चेंडू बॅटची कड घेऊन रिषभ पंतच्या हाती विसावला. इशान किशन याने पहिल्या सामन्यात नाबाद शतकी खेळी केली होती.