SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील हे दुसरे सर्वात जलद शतक; वैभव सूर्यंवशी विक्रम सेफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 21:40 IST2025-05-25T21:38:14+5:302025-05-25T21:40:47+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 SRH vs KKR Heinrich Klaasen Slams Joint Third Fastest Century In IPL History | SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला

SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 SRH vs KKR Heinrich Klaasen Slams Joint Third Fastest Century  : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील अखेरच्या सामन्यात हैदराबादच्या ताफ्यातील हेनरिक क्लासेन याने कोलकाता विरुद्ध विक्रमी सेंच्युरी झळकावली आहे. त्याने अवघ्या ३७ चेंडूत शतक साजरे केले. भारताचा माजी क्रिकेटर युसूफ पठाणच्या विक्रमाची बरोबरी करत त्याने आयपीएलच्या इतिहासातील संयुक्तरित्या सर्वात जलदगतीने सेंच्युरी झळकावली आहे. 
 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

क्लासेननं ठोकली IPL च्या इतिहासातील संयुक्तरित्या तिसरी जलद सेंच्युरी

जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीगमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम हा ख्रिस गेलच्या नावे आहे. २०१३ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु कडून खेळताना त्याने ३० चेंडूत शतक साजरे केले होते. यंदाच्या हंगामात १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीनं ३५ चेंडूत शतक झळकावले होते. त्यापाठोपाठ आता यूसूफ पठाणसह क्लासेनचा नंबर लागतो. 

GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट

२६९.२३ च्या स्ट्राइक रेटसह नाबाद १०५ धावांची खेळी

यंदाच्या हंगामात लोअर मिडल ऑर्डरमध्ये खेळताना दिसलेल्या क्लासेनला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली होती. ट्रॅविस हेडनं आक्रमक फलंदाजी करत निर्माण केलेल्या माहोल त्याने आणखी खास केला. हेड तुफान अर्धशतकी खेळी करून परतल्यावर क्लासेन याने आपल्या भात्यातील क्लास खेळीचा नजराणा पेश केला. त्याने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने २६९.२३ च्या स्ट्राइक रेटसह नाबाद १०५ धावांची खेळी केली. क्लासेन हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक रक्कमेसह रिटेन झालेला खेळाडू आहे. SRH च्या संघाने २३ कोटी रुपयांसह त्याला कायम ठेवले होते. 

आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकवणारे फलंदाज

  • ३० चेंडू- ख्रिस गेल (आरसीबी) विरुद्ध  पुणे वॉरियर्स इंडिया, बंगळुरु (२०१३)
  • ३५ चेंडू- वैभव सूर्यंवशी (राजस्थान रॉयल्स) विरुद्ध गुजरात जाएंट्स, जयपूर, २०२५
  • ३७ चेंडू- यूसूफ पठाण (राजस्थान रॉयल्स) विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुंबई, २०१०
  • ३७ चेंडू- हेनरिक क्लासेन (सनरायझर्स) हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स,दिल्ली, २०२५*
  • ३८ चेंडू- डेविड मिलर (पंजाब) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मोहाली, २०१३

 
 

Web Title: IPL 2025 SRH vs KKR Heinrich Klaasen Slams Joint Third Fastest Century In IPL History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.