Join us

IPL 2025 : विदर्भकराला इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी SRH कडून फिरकीतील जादू दाखवण्याची संधी

आधी इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात वर्णी लागली, मग आयपीएलमध्ये पदार्पणाची संधीही मिळाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 18:05 IST

Open in App

IPL 2025 SRH vs KKR 68th Match Player to Watch Harsh Dubey Sunrisers Hyderabad  पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स दोन्ही संघ दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरील लढतीनं यंदाच्या हंगामाची सांगता करतील. गत हंगामात फायनलमध्ये समोरासमोर दिसलेले दोन्ही संघ यांदाच्या हंगामात प्लेऑफ्समध्ये टिकू शकले नाहीत. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

SRH च्या संघानं हर्ष दुबेला दिली संधी

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने अखेरच्या टप्प्यात हर्ष दुबेला संधी दिल्याचे पाहायला मिळाले. डावखुऱ्या फिरकीपटूने पदार्पणात आपल्या फिरकीची जादूही दाखवून दिली. आता इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी अखेरच्या सामन्यात तो कशी कामगिरी करतोय ते पाहण्याजोगे असेल. इथं जाणून घेऊयात इंग्लंड दौऱ्यावर भारतीय 'अ' संघात स्थान मिळवल्यावर सनरायझर्स हैदराबादकडून IPL पदार्पण करणाऱ्या हर्ष दुबेसंदर्भातील खास कामगिरी   

 

IPL 2025 : MS धोनी येईल अन् पुन्हा येणार की, नाही हा प्रश्न सोडून जाईल!

देशांतर्गत क्रिकेटमध्ये दाखवून दिलीये फिरकीची जादू

२२ वर्षीय हर्ष दुबे हा इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय 'अ' संघाचा भाग आहे. त्याआधी त्याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाल्याचे पाहायला मिळाले. लखनौ विरुद्धच्या सामन्यातून त्याने आयपीएलमध्ये पहिला सामना खेळला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये हर्ष दुबे हा विदर्भ संघाकडून खेळतो. २०२४-२५ च्या रणजी हंगामात त्याने विदर्भकडून मैदानात उतरताना ६९ विकेट्स घेत विक्रमी कामगिरीसह विदर्भ संघाला रणजी जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. आतापर्यंत १८ प्रथम श्रेणी सामन्यात त्याने ९७ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.  

२ IPL मॅचमध्ये २ विकेट्स

हर्ष दुबेनं लखनौ विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात दमदार सुरुवात केली होती. पण फिल्डर्सची साथ न मिळाल्यामुळे त्याला फक्त एका विकेट्सवरच समाधान मानावे लागले होते. ४ षटकात त्याने ४४ धावा खर्च केल्या होत्या. बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात २ षटकात २० धावा खर्च करून त्याने एक विकेट घेतली होती. ३० लाख या मूळ किंमतीसह SRH च्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. अखेरच्या टप्प्यात या युवा फिरकीपटूला संघात स्थान देत सनरायझर्स हैदराबादचा संघ त्याला आगामी हंगामासाठी तयार करताना दिसते.   

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५सनरायझर्स हैदराबादकोलकाता नाईट रायडर्सइंडियन प्रीमिअर लीग