IPL 2025 SRH vs GT: मॉडर्न क्रिकेटमधील सर्वोत्तम फिल्डरवर आली मैदान सोडण्याची वेळ; नेमकं काय घडलं?

गुजरात टायटन्ससाठी हा एक मोठा धक्काच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 23:03 IST2025-04-06T22:56:55+5:302025-04-06T23:03:10+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 SRH vs GT Glenn Phillips Gets Injured As Substitute Fielder | IPL 2025 SRH vs GT: मॉडर्न क्रिकेटमधील सर्वोत्तम फिल्डरवर आली मैदान सोडण्याची वेळ; नेमकं काय घडलं?

IPL 2025 SRH vs GT: मॉडर्न क्रिकेटमधील सर्वोत्तम फिल्डरवर आली मैदान सोडण्याची वेळ; नेमकं काय घडलं?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 SRH vs GT Glenn Phillips Gets Injured : सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाला क्षेत्ररक्षणाच्या वेळी एक मोठा धक्का बसला. गुजरातच्या ताफ्यातून खेळणारा न्यूझीलंडच्या स्टार खेळाडू क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला. ग्लेन फिलिप्सवर लंगडत लंगडत मैदान सोडण्याची वेळ आली. गुजरात टायटन्ससाठी हा एक मोठा धक्काच आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सर्वोत्तम फिल्डरवर आली मैदान सोडण्याची वेळ

ग्लेन फिलिप्स हा मॉडर्न क्रिकेटमधील एक सर्वोत्तम फिल्डर आहे. सातत्याने आपल्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाने त्यानेल लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. फिल्डिंगच्या जोरावर सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या या खेळाडूला गुजरातच्या डावात क्षेत्ररक्षण करतावेळी दुखापत झाली.  तो मैदान सोडून बाहेर गेल्याचे पाहायला मिळाले.

IPL 2025 SRH vs GT : घरच्या मैदानात सिराजचा जलवा! ट्रॅविस हेडसह अभिषेक शर्माची विकेट घेत केली हवा

नेमकं कधी अन् काय घडलं?    
  
सनरायझर्स हैदराबादच्या डावातील सहाव्या षटकात गुजरातच्या संघाकडून प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर इशान किशनने हलक्या हाताने चेंडू पॉइंटच्या आणि गलीच्या मध्ये गॅपमध्ये टोलवला. ग्लेन फिलिप्सनं धावत जात चेंडू अडवला अन् थ्रोही केला. पण त्यानंतर स्नायू दुखापतीमुळे तो वेदनांनी व्याकूळ दिसला. फिजिओ मैदान आले अन् मग तो मैदान सोडून बाहेर गेल्याचे पाहायला मिळाले.

हैदराबादच्या घरच्या मैदानात गुजरातचा जलवा

घरच्या मैदानात खेळणाऱ्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होते. सिराजचा भेदक मारा अन् त्याला इतर गोलंदाजांनी दिलेली साथ याच्या जोरावर गुजरातच्या संघानं सनरायझर्स हैदराबादच्या संघाला निर्धारित २० षटकात १५२ धावांवर रोखले. धावांचा पाठलाग करताना गुजरातच्या संघानं मॅच जिंकली . 

Web Title: IPL 2025 SRH vs GT Glenn Phillips Gets Injured As Substitute Fielder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.