IPL 2025 SRH vs GT 19th Match Player to Watch Nitish Kumar Reddy Sunrisers Hyderabad : जगात भारी ठरलेल्या आयपीएल स्पर्धेतून प्रत्येक हंगामात प्रतिभावंत खेळाडूंची झलक पाहायला मिळते. प्रत्येक क्रिकेटर टीम इंडियाकडून खेळण्याचं स्वप्न घेऊनच मैदानात उतरत असतो. पण मोठ्या गर्दीत फार कमी खेळाडू असतात ज्यांना राष्ट्रीय संघात खेळण्याच भाग्य लाभते. आयपीएलच्या मैदानात धमक दाखवून अनेक क्रिकेटर्संनी टीम इंडियात एन्ट्री मारलीये. त्यातील एक चेहरा म्हणजे नितीशकुमार रेड्डी. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाची 'रीड की हड्डी' ठरलेला हा युवा क्रिकेटर आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. हा क्रिकेटर 'करोडपती' तरुणीमुळे पिक्चरमध्ये आला अन् आज तो क्रिकेटच्या मैदानातील 'रायझिंग स्टार' झालाय.
या 'करोडपती' तरुणीनं बदलले नितीश कुमार रेड्डीचं नशीब
या क्रिकेटरचं नशीब बदलणारी 'करोडपती' तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन. जवळपास ४०० कोटींचे नटवर्थ असणारी काव्या मारन ही सनरायझर्स हैदराबादच्या संघ बांधणीमध्ये चांगलीच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. २०२३ च्या हंगामासाठी तिने एक स्मार्ट निर्णय घेत २० लाख या मूळ किंमतीसह नितीश कुमार रेड्डीला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते.
IPL 2025: SRHची काव्या मारन 'या' व्यक्तीला करतेय डेट? आहे बॉलिवूडचा सर्वात महागडा संगीतकार
२०२४ चा हंगाम गाजवत मारली टीम इंडियात एन्ट्री
२०२३ च्या पदार्पणाच्या हंगामात नितीश कुमार रेड्डीला फक्त दोन सामन्यात संधी मिळाली. पण २०२४ च्या हंगामात १३ सामन्यात ३०३ धावा आणि ३ विकेट्स घेत नितीश कुमार रेड्डीनं आपली खास छाप सोडली. सनरायझर्स हैदराबादच्या संघाला फायनलपर्यंत नेण्यात नितीश कुरमा रेड्डीनं मोलाचं योगदान दिले. याच कामगिरीच्या जोरावर या पठ्ठ्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने टीम इंडियाकडून कसोटीत दमदार पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले.
नव्या हंगामा आधी लागला 'करोपडती'चा टॅग पहिल्या दोन हंगामात २० लाख या मूळ किंमतीसह सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातून खेळणाऱ्या नितीश कुमार रेड्डीला आयपीएलच्या मेगा लिलावाआधी रिटेन करण्यात आले. त्यासाठी काव्या मारन यांनी तब्बल ६ कोटी रुपये एवढी मोठी रक्कम खर्च केली. लखपती खेळाडू करोडपती क्रिकेटर्सच्या यादीत सामील झाला. रिटेन रिलीजच्या खेळाआधीच नितीश कुमार रेड्डीची टीम इंडियात एन्ट्री झाल्यामुळे तो कॅप्ड खेळाडूच्या रुपात रिटेन झाला. जर त्याला टीम इंडियात संधी मिळाली नसती तर बीसीसीआयच्या नियमानुसार, अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात त्याची रिटेन प्राइज ही ४ कोटींपर्यंतच मर्यादीत राहिली असती. नितीश कुमार रेड्डीची आयपीएलमधील कामगिरी
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात नितीश कुमार रेड्डीने १९ सामन्यात ३८४ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत ३ विकेट्स त्याच्या खात्यात जमा आहेत. यंदाच्या हंगामातील राजस्थान विरुद्धच्या पहिल्या साम्न्यातत्याच्या भात्यातून १५ चेंडूत ३० धावांची खेळी पाहायला मिळाली होती. दुसऱ्या सामन्यातही त्याने २८ चेंडूत तिशीचा आकडा गाठताना ३२ धावा केल्यात पण या खेळीच मोठया खेळीत रुपांत करण्यात तो चुकला. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात तर त्याला खातेही उघडता आले नव्हते. कोलकात विरुद्धच्या सामन्यात त्याने १५ चेंडूत १९ धावांची खेळी केली. ही कामगिरी आणखी उंचावत संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी तो प्रयत्नशील असेल.