Join us

दोन्हीं दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)

संघ अडचणीत असताना स्टब्स अन् निगम दोघांनी डाव सावरला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 00:09 IST

Open in App

Kavya Marans Epic Reaction Video Goes Viral : हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात हैदराबादचा संघ प्ले ऑफ्सच्या शर्यतीतील आस टिकवून ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरला. पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेत घरच्या मैदानावर हैदराबादच्या संघाने दमदार गोलंदाजीही केली. पॅट कमिन्सनं पॉवर प्लेमध्ये घेतलेल्या ३ विकेट्स अन् त्याला जयदेव उनाडकटसह हर्षल पटेलनं दिलेली साथ याच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने २९ धावांत दिल्लीचा अर्धा संघ तंबूत धाडला होता. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

संघ अडचणीत असताना स्टब्स अन् निगम दोघांनी डाव सावरला, पण...

संघ अडचणीत असताना ट्रिस्टन स्टब्स आणि विपराज निगम यांनी संघाचा डाव सावरला. ही जोडी जमलीये असे वाटत असताना दोघांच्यात ताळमेळाचा अभाव दिसून आला. परिणामी रन आउटच्या रुपात दिल्लीच्या संघाला आणखी एक धक्का बसला. १३ व्या षटकातील झीशान अन्सारीच्या पहिल्याच चेंडूवर स्टब्सनं लेग साइडच्या दिशेनं चेंडू टोलावला. या फटक्यावर पहिली धाव पूर्ण केल्यावर स्टब्स दुसऱ्या धावेसाठी परतला. स्ट्राइक एन्डला असलेला विपराज निगम धाव नको म्हणत असताना स्टेब्स नॉन स्ट्राइकवरून स्ट्राइक एन्डला जाऊन पोहचला. दोघे एकाच क्रिजमध्ये पोहचल्यावर नॉन स्ट्राइक एन्डला झीशान याने अगदी आरामत स्टंप्सवरील बेल्स उडवत संघाला आणखी एक यश मिळवून दिले.

SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक

काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल

दिल्लीकरांच्यातील ताळमेळ ढासळल्यावर ही विकेट मिळावी यासाठी स्टँडमध्ये उपस्थितीत हैदराबादची मालकीण काव्या मारनची रिॲक्शन बघण्याजोगी होती. ती मोठ्या तळमळीनं अगदी दातओठ खात ती आउट करा लकर असा इशारा करताना दिसली. स्टँडमधील तिची हावभाव दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 

शेवटी हैदराबाद प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाद

घरच्या मैदानात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने बॉलिंगमध्ये दमदार कामगिरी केली. दिल्लीच्या संघाला त्यांनी फक्त १३३ धावांवर रोखले. या धावसंख्येचा जलद पाठलाग करत ते नेटरनरेट सुधारून प्लेऑफ्सची आस कायम ठेवतील, अशी अपेक्षा होती. पण पावसाच्या व्यत्ययामुळे दुसरा डावातील खेळच झाला नाही. सामना रद्द करण्यात आल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला. परिणामी सनरायझर्स हैदराबादचा संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाद झाला. 

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५सनरायझर्स हैदराबाददिल्ली कॅपिटल्सव्हायरल व्हिडिओकाव्या मारन