Join us

SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल

करुण नायरवर दुसऱ्यांदा आली शून्यावर बाद होण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 20:31 IST

Open in App

 

देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर आयपीएलमधी पुन्हा संधी मिळालेल्या करुण नायरनं धमाकेदार अंदाजात कमबॅक केले. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मैदानात उतरत त्याने ४० चेंडूत ८९ धावांची खेळी केली. त्यानंतर त्याला सातत्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. पण या संधीचं सोनं करण्यात तो अपयशी ठरला. दमदार कमबॅकनंतर करुण नायरनं मला एक संधी हवी, अशी साद घालणारे डिअर क्रिकेट प्लीज गिव्ह मी वन चान्स हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले होते. आता याच ट्विटचा आधार घेत फ्लॉपशोनंतर त्याला ट्रोल करण्यात येत आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

याला पुन्हा संधी देऊ नका; करुण नायर झाला ट्रोल

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात करुण नायर याला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. पण पॅट कमिन्सच्या पहिल्याच चेंडूवर तो विकेटमागे इशान किशनच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा त्याच्या पदरी भोपळा पडला. याआधी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ३ चेंडूंचा सामना करून तो शून्यावर बाद झाला होता. दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ... याला पुन्हा संधी देऊ नका. अशा आशयाच्या ट्विटसह एका नटकऱ्याने त्याला ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले.

IPL च्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या Uncapped Players ची यादी

करुण नायरची आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील कामगिरी

आयपीएलमध्ये ३ वर्षांनी कमबॅक करताना मुंबई इंडियन्स विरुद्ध करुण नायरनं ४० चेंडूत ८९ धावांची खेळी केली. या सामन्यातही संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर राजस्थान विरुद्ध त्याच्या पदरी भोपळा पडला. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात त्याला डावाला सुरुवात करण्याची सधी मिळाली होती. या सामन्यात १८ चेंडूत ३१ धावा करत पुन्हा ट्रॅकवर आल्याचे संकेत दिले. लखनौ विरुद्धही तो ओपनिंगला खेळताना दिसले. या सामन्यात तो ९ चेंडूत १५ धावा करून तंबूत परतला होता. बंगळुरु आणि कोलकाता विरुद्धच्या सामन्यात तो अनुक्रमे  ४ चेंडूत ४ धावा आणि १३ चेंडूत १५ धावा करून बाद झाल्याचे पाहायला मिळाले.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५इंडियन प्रीमिअर लीगसनरायझर्स हैदराबाददिल्ली कॅपिटल्स