Join us

IPL 2025 : ऑरेंज आर्मीचं गणित फसलंय! १ कोटींचं पॅकेज दिलं, पण त्याच्यावर भरवसाच नाही ठेवला

इथं जाणून घेऊया हैदराबादच्या ताफ्यातील लयीत दिसणाऱ्या गोलंदाजाच्या कामगिरीवर एक नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 14:16 IST

Open in App

IPL 2025 SRH vs DC 55th Match Player to Watch Jaydev Sunrisers Hyderabad : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील ५५ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ घरच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला भिडणार आहे. पहिल्या १० सामन्यात फक्त ३ विजयासह पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाच्या खात्यात ६ गुण जमा आहेत. उर्वरित सर्व सामने जिंकले तरी उपविजेत्या संघाला १४ गुणांपर्यंतच मजल मारता येईल. याआधी १४ च्या कट ऑफसह संघ प्लेऑफ्ससाठी पात्र ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. पण यंदा ते शक्य होईल, असे वाटत नाही. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सनरायझर्स हैदराबादची डाळ शिजणं 'मुश्किल'च, पण..

कारण मुंबई इंडियन्सचा संघ ११ सामन्यानंतर १४ गुणांसह तिसऱ्या तर गुजरात संघ १० सामन्यानंतर १४ गुणांसह आधीच आघाडीच्या ४ मध्ये दिसतोय. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद संघ ज्या  दिल्ली कॅपिटल्सला भिडणार आहे तो संघ १० सामन्यानंतर १२ गुणांसह प्लेऑफ्सच्या शर्यतीत अधिक भक्कम आहे. पण हा सामना जिंकून हैदराबादचा संघ दिल्लीचा सोपा पेपर अवघड करू शकतो. सनरायझर्स हैदराबादच्या स्फोटक बॅटरशिवाय लेट एन्ट्री मारणारा जयदेव उनाडकट दिल्ली कॅपिटल्ससाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. या गोलंदाजासाठी सनरायझर्स हैदराबादच्या संघाने १ कोटींचा डाव खेळला होता. पण त्याच्यावर भरवसा नाही ठेवला. फक्त चार सामन्यातच त्याला संधी दिली.  इथं जाणून घेऊया हैदराबादच्या ताफ्यातील या गोलंदाजाच्या कामगिरीवर एक नजर

PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'

शंभरहून अधिक IPL सामने खेळणाऱ्या गोलंदाजाची लेट एन्ट्री

शंभरहून अधिक आयपीएल सामन्यांचा अनुभव असलेला हा गोलंदाज गत हंगामापासून सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून खेळताना दिसत आहे. याआधी तो राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौच्या ताफ्यातूनही खेळताना पाहायला मिळाले आहे. गत हंगामात ११ सामन्यात त्याने ८ विकेट्स घेतल्या होत्या. पण यंदाच्या हंगामात त्याला फक्त ४ सामन्यात संधी मिळाली. लेट एन्ट्रीनंतर त्याने ६ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले.  उर्वरित सामन्यातील त्याची कामगिरी संघासाठी अधिक उपयुक्त ठरण्याऐवजी प्रतिस्पर्धी संघाला टेन्शन देणारी ठरू शकते. 

जयदेव उनाडकटची IPL मधील कामगिरी

यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने पाचव्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध  त्याला पहिली संधी दिली. या सामन्यात तो विकेट लेस राहिला. त्यानंतरच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने हंगामातील पहिली विकेट घेतली. मग तो थेट चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात खेळातना दिसले. ज्यात त्याने २ विकेट्स घेतल्या.  गुजरात टायटन्स विरुद्धच्या मागच्या सामन्यात त्याने ४ षटकांच्या कोट्यात ३५ धावा खर्च करून ३ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले. ही त्याची यंदाच्या हंगामातील सर्वोच्च कामगिरी ठरली. आतापर्यंत १०९ सामन्यात त्याने १०५ विकेट्स घेतल्या असून २५ धावा खर्च करत ५ विकेट्स ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. २०१३ च्या हंगामातील या कामगिरीशिवाय त्याने २०१७ च्या हंगामातही ३० धावा खर्च करताना ५ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५सनरायझर्स हैदराबाददिल्ली कॅपिटल्सइंडियन प्रीमिअर लीग