Vaibhav Suryavanshi Breaks Down In Tears After Stump Out : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील जयपूरच्या मैदानात रंगलेला ३६ वा सामना १४ वर्षांच्या पोरानं अविस्मरणीय केला. राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून वैभव सूर्यंवशी याने दिमाखात पदार्पण केले. शार्दुल ठाकूरचा सामना करताना पहिल्याच चेंडूवर ८० मीटर लांब षटकार मारत त्याने यंदाच्या हंगामात धमाका करण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जलदगती गोलंदाजांचा समाचार अन् फिरकी गोलंदाजांविरुद्ध परिपक्वता
आवेश खानचे स्वागत षटकाराने करून जलदगती गोलंदाजाला घाबरत नाही, हा तोरा या १४ वर्षाच्या पोराने दाखवला. मग पंतने फिरकीपटूच्या हाती चेंडू सोपवला. या पोरानं स्पिनरला उत्तमरित्या खेळेत १४ वर्षांचा असलो तरी क्रिकेटच्या मैदानात लिंबू टिंबू नाही ते दाखवून दिले. वयाच्या १४ व्या वर्षी पदार्पण अन् त्याने दाखवलेली परिपक्वता ही कमालीची होती. पहिल्याच सामन्यात तो अर्धशतक झळकाण्याच्या इराद्याने खेळताना दिसला.
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
मार्करमच्या गोलंदाजीवर फसला, अन् विकेट गमावल्यावर अश्रू झाले अनावर
पण मार्करमच्या गोलंदाजीवर तो फसला. राजस्थान रॉयल्सच्या डावातील ९ व्या षटकात पार्ट टाइम बॉलर मार्करम याने पदार्पणाचा आयपीएल सामना खेळणाऱ्या वैभव सूर्यंवशीला चकवा दिला. रिषभ पंतने यष्टीमागे चपळाई दाखवत ही संधी साधली अन् वैभव सूर्यंवशीच्या खेळीला ब्रेक लागला. त्याने २० चेंडूत २ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारासह कडक ट्रेलर दाखवून दिला. विकेट गमावल्यावर तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याला अश्रू अनावर झाले. पदार्पणाचा सामना अन् विकेट गमावल्यावर दाटून आलेला त्याचा हुंदका मोठ्या खेळीची हुकलेली संधी गमावल्याची मनातील खंत व्यक्त दाखवणारा होता.
Web Title: IPL 2025 RR vs LSG 14 Year Old Vaibhav Suryavanshi Breaks Down In Tears After Getting Stump Out By Rishabh Pant
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.