Join us

Quinton De Kock Smart Catch : नया है यह! क्विंटन डिकॉकनं आधी हेल्मेट काढलं, मग कॅचवर गेला अन्...

चेंडू उंच हवेत उडाल्यावर क्विंटन डिकॉकनं कॅच मी घेतोय असे म्हणत चेंडूच्या दिशेनं धाव घेतली. पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 22:51 IST

Open in App

Quinton De Kock Removed Helmet Catch of Riyan Parag Watch Video : कोलकाता आणि राजस्थान यांच्यातील  गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात क्विंटन डिकॉकच्या कॅचनं सर्वांच लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले. राजस्थानच्या संघानं संजू सॅमसनच्या रुपात पहिली विकेट अगदी स्वस्तात गमावल्यावर कार्यवाहू कर्णधार रियान पराग मैदानात आला. तो चांगली फटकेबाजी करत संघाचा डाव सावरत असताना वरुण चक्रवर्तीनं रियानला आपल्या चक्रव्यूव्हमध्ये अडकवले. क्विंटन डिकॉनं त्याचा झेल टिपला. हा झेल घेताना क्विंटन डिकॉकनं जी कृती केली ती लक्षवेधी अन् फिल्डवरील एक स्मार्टनेसचा खास नजराणा पेश करणारी होती. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

रियान परागनं उंच हवेत मारला चेंडू, कॅचसाठी क्विंटन डिकॉकनं हेल्मट काढून घेतली धाव  

संजू सॅमसनच्या जागी आलेल्या रियान परागनं तीन षटकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. पण वरुण चक्रवर्तीनं त्याचा हा गेम प्लान फार काळ टिकू दिला नाही. राजस्थान रॉयल्सच्या डावातील आठव्या षटकात वरुण चक्रवर्ती गोलंदाजी करत होता. तिसऱ्या चेंडूवर रियान परागने उत्तुंग षटकार मारला. चौथा चेंडू निर्धाव खेळल्यावर पाचव्या चेंडूवर रियानने पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र तो फसला. चेंडू उंच हवेत उडाल्यावर क्विंटन डिकॉकनं कॅच मी घेतोय असं म्हणत   चेंडूच्या दिशेनं धाव घेतली. पण याआधी त्याने आपलं हेल्मेट काढलं अन् त्याने एक अप्रतिम कॅच पकडला. 

IPL 2025 RR vs KKR: संजूचा नो 'इम्पॅक्ट' शो!; आपल्या विकेटसाठी स्वत:च विणलं यॉर्करचं जाळं (VIDEO)

फिल्डवरील स्मार्टनेसची चर्चा

क्रिकेटच्या मैदानात अनेक अप्रतिम कॅच पाहायला मिळत असतात. क्विंटन डिकॉकनं घेतलेला कॅच हा त्यापैकीच एक आहे. या कॅचवेळी त्याने दाखवलेला स्मार्टनेसची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. उंच हवेत उडालेला झेल हा अन्य फिल्डरच्या तुलनेत विकेट किपरसाठी सोपा असतो. कारण त्याच्या हातात ग्लोव्ह्ज असतात. हा कॅच कॅरी करताना हेल्मेट अडथळा ठरू शकले असते. हेच लक्षात घेत स्मार्टनेस दाखवत क्विंटन डिकॉकनं हेल्मेट काढून रियान परागचा खेळ खल्लास केला.

घरच्या मैदानावर रियानला मिळाली कॅप्टन्सीची संधी, पण मोठी खेळी करण्यात ठरला अपयशी

घरच्या मैदानावर कॅप्टन्सी करताना रियान परागला मोठी खेळी करून मैदान गाजवण्याची संधी होती. त्याने उत्तम सुरुवातही केली. पण प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात तो फसला. १५ चेंडूत ३ षटकाराच्या मदतीने २५ धावा करून त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला. वरुण चक्रवर्तीनं त्याच्या रुपात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५राजस्थान रॉयल्सकोलकाता नाईट रायडर्सक्विन्टन डि कॉक