IPL 2025 RR vs KKR : क्विंटन डिकॉकनं सिक्सर मारत संपवली मॅच; गत चॅम्पियन संघानं उघडलं विजयाचं खातं

राजस्थान विरुद्धच्या सामन्यात कोलकाताच्या संघानं ८ विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 23:17 IST2025-03-26T23:09:12+5:302025-03-26T23:17:04+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 RR vs KKR Quinton De Kock Not Out 97 Runs Kolkata Knight Riders won by 8 wkts Against Rajasthan Royals | IPL 2025 RR vs KKR : क्विंटन डिकॉकनं सिक्सर मारत संपवली मॅच; गत चॅम्पियन संघानं उघडलं विजयाचं खातं

IPL 2025 RR vs KKR : क्विंटन डिकॉकनं सिक्सर मारत संपवली मॅच; गत चॅम्पियन संघानं उघडलं विजयाचं खातं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 RR vs KKR Quinton De Kock Not Out 97 Runs आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सलामीच्या लढतीतील पराभवानंतर गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं अखेर पहिला विजय नोंदवला आहे. राजस्थानच्या संघानं दिलेल्या १५२ धावांचा पाठलाग करताना सलामीवीर क्विंटन डिकॉकनं नाबाद ९७ धावांची खेळी केली. त्याने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर षटकार मारत संघाचा पहिला विजय निश्चित केला.  अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाने या  विजयासह आपल्या खात्यात २ गुण जमा केले असून ८ गडी राखून मिळवलेल्या विजयासह त्यांनी पुन्हा एकदा हंगाम गाजवण्यासाठी तयार आहोत, याचे संकेत दिले आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ हुकमी एक्का असलेल्या सुनील नरेनच्या अनुपस्थितीत मैदानात उतरला होता. पण त्याच्या अनुपस्थितीचा कोणताही फटका संघाला बसला नाही. त्यामुळे दुसऱ्याच सामन्यात त्यांची बेंच स्ट्रेंथ स्ट्राँग असल्याचेही दिसून आले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

क्विंटन डिकॉकनची जबरदस्त बॅटिंग, सिक्सर मारत संपवली मॅच

पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ९ बाद १५१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना क्विंटन डिकॉक आणि मोईन अली या जोडीनं कोलकाता संघाच्या डावाची सुरुवात केली.  संघाच्या धावफलकावर ४१ धावा असताना मोईन अली आणि क्विंटन डिकॉक यांच्यात ताळमेळाचा अभाव दिसून आला. यात मोईन अलीनं धावबादच्या रुपात आपली विकेट गमावली. त्याने १२ चेंडूत ५ धावा केल्या. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या अजिंक्य रहाणेनं १५ चेंडूत १८ धावा करत तंबूचा रस्ता धरला. हसरंगाने त्याची विकेट घेतली. पण त्यानंतर अंगकृष्ण रघुवंशीच्या साथीनं क्विंटन डिकॉकनं कोणतीही पडझड न होऊ देता  सिक्सर मारत मॅच संपवली. रघुवंशीनं १७ चेंडूत नाबाद २२ धावा केल्या.  क्विंटन डिकॉकनं ६१ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने ९७ धावांची नाबाद खेळी केली.

Quinton De Kock Smart Catch : नया है यह! क्विंटन डिकॉकनं आधी हेल्मेट काढलं, मग कॅचवर गेला अन्...

कोलकाताची परफेक्ट बॉलिंग,  राजस्थानकडून एकही बॅटर नाही चालला

गुवाहाटीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वैभव अरोरानं संजू सॅमसनच्या रुपात पहिली विकेट घेत कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. वरुण चक्रवर्ती आणि मोईन अलीनं आपल्या फिरकीच्या जोरावर  राजस्थान रॉयल्सच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. या दोघांशिवाय  वैभव अरोरा, हर्षित राणा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेत राजस्थान रॉयल्सला थोडक्या धावांतच आटोपले.  स्पेन्सर जॉन्सनच्या खात्यातही एक विकेट जमा झाली.  राजस्थानकडून ध्रुव जुरेल ३३ (२८), यशस्वी जैस्वाल २९ (२४), जोफ्रा आर्चर १६ (७) आणि संजू सॅमसन १३ (११) यांनी दुहेरी आकडा गाठला. पण ही खेळी मोठी करण्यात एकही यशस्वी ठरला नाही. परिणामी राजस्थान रॉयल्सचा संघ ९ विकेट्सच्या मोबदल्यात निर्धारित २० षटकांत १५१ धावांपर्यंतच मजल मारली. हे आव्हान परतवून लावत कोलकाताने सहज बाजी मारली.

Web Title: IPL 2025 RR vs KKR Quinton De Kock Not Out 97 Runs Kolkata Knight Riders won by 8 wkts Against Rajasthan Royals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.