धोनी, विराट अन् रोहित ठिकय! पण रियान खरंच चाहत्यानं पाया पडण्याऐवढा 'महान' आहे का?

जाणून घ्या या युवा क्रिकेटची एवढी क्रेझ दिसण्यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 00:40 IST2025-03-27T00:32:39+5:302025-03-27T00:40:28+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 RR vs KKR Cricket Fan Entered The Ground And Touched Riyan Parag Feet Like Virat Kohli MS Dhoni And Rohit Sharma Why | धोनी, विराट अन् रोहित ठिकय! पण रियान खरंच चाहत्यानं पाया पडण्याऐवढा 'महान' आहे का?

धोनी, विराट अन् रोहित ठिकय! पण रियान खरंच चाहत्यानं पाया पडण्याऐवढा 'महान' आहे का?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामातील सहावा सामना गुवाहाटीच्या मैदानात खेळवण्यात आला. गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानंतर क्विंटन डिकॉकनं केलेल्या कडक खेळीच्या जोरावर गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स संघानं हा सामना दिमाखात जिंकला. राजस्थान रॉयल्सच्या संघावर रियान परागच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्या पराभवाची नामुष्की ओढावली. पण हे सगळं घडतं असताना गुवाहटीच्या मैदानात लोकल बॉय रियान परागची क्रेझही पाहायला मिळाली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

रियानसाठी कायमपण; युवा क्रिकेटरसाठी चाहता थेट मैदानात घुसला अन्...

एक चाहता रियान परागला भेटण्यासाठी थेट मैदानात घुसल्याचे पाहायला मिळाले. कोलकाता नाईट रायडर्सच्या डावातील १२ व्या षटकात रियान गोलंदाजी करत असताना हा प्रकार घडला. मैदानात आलेल्या या क्रिकेट चाहत्याने रियान परागचे पाय धरले. त्यानंतर क्रिकेटरनंही त्याची गळाभेटही घेतली. हे चित्र रियान परागनं आपला एक खास चाहतावर्ग कमाल्याची झलक दाखवून देणारे होता. 

 Quinton De Kock Smart Catch : नया है यह! क्विंटन डिकॉकनं आधी हेल्मेट काढलं, मग कॅचवर गेला अन्...

धोनी, विराट अन् रोहित ठिकय! पण रियान खरंच चाहत्यानं पाया पडण्याऐवढा 'महान' आहे का? 

आपल्या आवडत्या क्रिकेटरला भेटण्यासाठी बऱ्याचदा क्रिकेटच्या मैदानात चाहते मैदानात घुसल्याचे याआधीही पाहायला मिळाले आहे. महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा या स्टार क्रिकेटर्सला भेटण्यासाठी सुरक्षा कवच तोडून  चाहत्यांनी मैदानात एन्ट्री मारल्याचे पाहायला मिळाले आहे. काहींना तर अशा कृतीनंतर शिक्षाही भोगावी लागलीये. आता रियानचा जबरा फॅन बघून काहींना असाही प्रश्न पडू शकतो की, धोनी, विराट अन् रोहित ठिकय! पण रियान पराग खरंच  एवढा महान किवा मोठा झालाय का? पण त्यामागचं कारण वेगळं आहे. तो विराट, रोहित किंवा धोनीसारखा महान खेळाडू नाही. पण त्याची क्रेझ निर्माण होण्यामागे एक खास कारण आहे.

या कारणामुळं तिथल्या लोकांसाठी तो हिरोच

पहिला मुद्दा हा की, कोलकाता आणि राजस्थान यांच्यातील जो सामना झाला तो गुवाहाटीच्या मैदानात खेळवण्यात आला. रियान पराग हा इथला लोकल बॉय आहे. एवढेच नाही तर ईशान्य भारतातून टीम इंडियात एन्ट्री मारणारा पहिला क्रिकेटर अशी त्याची ओळक आहे. या भागात पडणारा मुसळधार पाऊस, क्रिकेटसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव असताना रियान परागनं क्रिकेटमध्ये नाव कमावलंय. या चेहऱ्यामुळे आसामसारख्या भागात क्रिकेटबद्दलची क्रेझ वाढू लागलीये. तिथल्या लोकांसाठी तो एक मोठा हिरोच आहे.  कदाचित त्यामुळेच गुवाहटीमध्ये या युवा क्रिकेटरबद्दल एक वेगळी क्रेझ पाहायला मिळाली.

Web Title: IPL 2025 RR vs KKR Cricket Fan Entered The Ground And Touched Riyan Parag Feet Like Virat Kohli MS Dhoni And Rohit Sharma Why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.