Join us

Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकवण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 22:14 IST

Open in App

14 Year Old Vaibhav Suryavanshi Breaks World Record Youngest To Hit T20 Fifty : जयपूरच्या मैदानात रंगलेल्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा  १४ वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यंवशीनं नवा इतिहास रचला आहे. आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावताना त्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला. एवढेच नाही तर १७ चेंडूत अर्धशतक झळकावत त्याने यंदाच्या हंगामातील सर्वात जलद अर्धशतकही आपल्या नावे  नोंदवले आहे.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वात जलद अर्धशतक झळकवणारे फलंदाज

  • वैभव सूर्यंवशी, राजस्थान विरुद्ध गुजरात, जयपूर- १७ चेंडूत
  • निकोलस पूरन, लखनौ विरुद्ध चेन्नई, मुल्लानपूर- १८ चेंडूत
  • ट्रॅविस हेड, हैदराबाद विरुद्ध राजस्थान, हैदराबाद-२१ चेंडूत
  • निकोलस पूरन, लखनौ विरुद्ध कोलकाता, कोलकाता-२१ चेंडूत
  • मिचेल मार्श, लखनौ विरुद्ध दिल्ली, विशाखापट्टणम- २१ चेंडूत

वैभव सूर्यंवशीचा धमाका, अर्धशतकासह रचला नवा विक्रम

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकवण्याचा विक्रम याआधी अफगाणिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद नबीचा मुलगा हसन इसाखिल याच्या नावे होता.  त्याने काबूल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर श्पागेझा लीग २०२२ स्पर्धेत काबूल ईगल्स विरुद्धच्या सामन्यात बूस्ट डिफेंडर्सकडून खेळताना १५ वर्षे ३६० दिवस वयात अर्धशतक झळकावले होते. वैभव सूर्यंवशी याने १४ वर्षे ३२ दिवस वयात अर्धशतक झळकावत त्याचा हा विक्रम मोडित काढला आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५