Join us

वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा

भव सूर्यंवशीचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यात तो महेंद्रसिंह धोनीचे पाय धरून आशीर्वाद घेताना दिसते. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 00:13 IST

Open in App

Vaibhav Suryavanshi Touches Feet Of MS Dhoni : इंडियन प्रीमिअर लीगच्या १८ व्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा प्रवास प्लेऑफ्सआधीच संपुष्टात आला. दिल्लीच्या मैदानात रंगलेल्या अखेरच्या सामन्यात राजस्थानच्या संघाने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धचा सामना जिंकून स्पर्धेची सांगता विजयासह केली. या सामन्यात १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीनं अर्धशतकी खेळी केली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दमदार फटकेबाजीनंतर १४ वर्षांच्या मुलाच्या दाखवली संस्काराची चर्चा 

पदार्पणाच्या हंगामातील धमाकेदार बॅटिंगनंतर त्याच्यात दडलेल्या संस्कारी मुलाची झलक पाहायला मिळाली. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान यांच्यातील सामन्यानंतर आता वैभव सूर्यंवशीचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यात तो महेंद्रसिंह धोनीचे पाय धरून दिग्गज कॅप्टनचे आशीर्वाद घेताना दिसते. 

IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!

धोनी अन् वैभव यांच्यातील ते दृश्य ठरले लक्षवेधी

मॅच संपल्यावर दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना भेटत असताना वैभव सूर्यंवशीनं केलेल्या कृतीन सर्वांचे लक्षवेधून घेतले. आयपीएलमधील सर्वात वयस्क खेळाडू समोर आल्यावर या स्पर्धेतील सर्वात युवा पोरानं त्याचे पाय धरत आपल्यातील संस्कारी मुलाची झलक दाखवून दिली. मॅचनंतरही ही फ्रेम एकमद खासच होती. चेन्नई विरुद्धच्या आधीच्या सामन्यावेळीही वैभवनं धोनीसंदर्भातील आदर अशाच प्रकारे व्यक्त केला होता. पण त्यावेळी तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. यावेळी दमदार खेळी केल्यावर त्याने कॅप्टन कूल धोनीसंदर्भातील आदर पुन्हा त्याच अंदाजात जपल्याचे पाहायला मिळाले.

वैभव सूर्यंवशीनं हंगाम गाजवला

या सामन्यात वैभव सूर्यंवशी याने धावांचा पाठलाग करताना ३३ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५७ धावांची खेळी केली. यंदाच्या हंगामात शतकी खेळीसह ऐतिहासिक कामगिरी नोंदवणाऱ्या वैभवनं अखेरच्या सामन्यात अर्धशतकी खेळीसह यंदाचा हंगाम खास आणि अविस्मरणीय केला आहे. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५चेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्समहेंद्रसिंग धोनीव्हायरल व्हिडिओ