IPL 2025 RR vs CSK : क्रिकेट हा जेंटलमॅन गेम मानला जातो. पण मॉडर्न जमान्यात बऱ्याचदा क्रिकेटच्या मैदानात दोन खेळाडूंमधील स्लेजिंगचा मुद्दा गाजतो. आयपीएल त्याला अपवाद नाही. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील लढतीत हार्दिक पांड्या आणि साई किशोर यांनी एकमेकांना दिलेली खुन्नस चर्चेचा विषय ठरली. त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढतीत विराट कोहली आणि खलील अहमद यांच्यातही असेच काहीसे दृश्य पाहायला मिळाले. सोशल मीडियावर याची चर्चाही रंगली. आता याउलट एका चांगल्या कृतीनं चेन्नई सुपर किंग्ज संघाचा मराठमोळा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऋतुराजच्या खिलाडूवृत्तीवर नेटकरी झाले फिदा
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून नितीश राणाची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. त्याच्या खेळीला ब्रेक लावत चेन्नईनं सामन्यात कमबॅक केले. राजस्थानच्या ताफ्यातील कॅरेबियन बॅटर फलंदाजीसाठी क्रिजवर असताना ऋतुराज गायकवाड त्याच्या शूजच्या लेस बांधताना दिसून आले. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकजण ऋतुराजच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक करताना दिसून येत आहे.
चेपॉकवर दिसला तो फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी! कोहलीनं CSK च्या गोलंदाजाला दिली वॉर्निंग?
हेटमायर अल्प खेळी करून फिरला माघारी
राजस्थानकडून हेटमायर हा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. तो मोठी फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. चेन्नई विरुद्ध त्याच्या बॅटमधून १ चौकार आणि १ षटकार पाहायला मिळाला. पण तो शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याने १६ चेंडूत १९ धावांचे योगदान दिले. त्याच्या रुपात गमावलेल्या नवव्या विकेट्ससह राजस्थानच्या संघानं निर्धारित २० षटकात धावफलकावर १८२ धावा लावल्या.