IPL २०२५ RR vs CSK Nitish Rana Slams The 2nd Joint Fastest Fifty : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या लढतीत राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या नितिश राणाला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली अन् त्याने या संधीच सोनं करून दाखवलं. यशस्वी जैस्वाल स्वस्ता माघारी फिरल्यावर त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या राणानं तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत २१ चेंडूत अर्धशत पूर्ण केले. अर्धशतकानंतर त्याने बॅटचा पाळणा करून खास सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. त्याने स्फोटक अंदाजात केलेल्या अर्धशतकी खेळीसह त्याच्या सेलिब्रेशनची चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून येते. राजस्थान रॉयलसह नितीश राणाची पत्नी साची मारवाह हिनेही नवरोबाच्या स्फोटक खेळीनंतरच्या सेलिब्रेशनचा खास फोटो आपल्या इन्स्टाग्रम अकाउंटवरुन शेअर केला आहे. नवा रंग अन् फादर्स स्पेशल इनिंग असा उल्लेख तिच्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!वादळी खेळीसह ३१ वर्षीय खेळाडूनं यंदाच्या हंगामात सर्वात जलद अर्धशतके झळकवणाऱ्या निकोलस पूरन आणि मिचेल मार्शच्या पंक्तींत एन्ट्री मारली आहे. निकोलस पूरन याने यंदाच्या हंगामात १८ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. मिचेल मार्शसह नितीश राणा या यादीत संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे. या दोघांनी यंदाच्या हंगामात २१ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे.
Best Catch Of The Season : ...अन् अनिकेतचा 'हिट शो' थांबण्यासाठी जेक फ्रेझर-मॅकगर्क झाला 'सुपरमॅन'
यंदाच्या हंगामात जलद अर्धशतकी खेळी करणारे फलंदाज
- निकोलस पूरन (लखनऊ सुपर जाएंट्स)- १८ चेंडूत अर्धशतक, विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
- मिचेल मार्श (लखनऊ सुपर जाएंट्स)- २१ चेंडूत अर्धशतक, दिल्ली कॅपिटल्स
- नितीश राणा (राजस्थान रॉयल्स) २१ चेंडूत अर्धशतक, विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
३२ चेंडूत ८१ धावांची धमाकेदार खेळी
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात नितिश राणाला शतकी डाव साधण्याची संधी होती. पण राजस्थानच्या डावातील १२ व्या षटकात अश्विनने त्याला चकवा दिला. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर राणाचा पुढे येऊन खेळण्याचा डाव अश्विननं चलाकीनं हाणून पाडला. जाणूवपूर्वक वाइट चेंडू टाकत अश्विनने धोनीकरवी त्याला यष्टिचित केले. राणानं ३६ चेंडूत १० चौकार आणि ५० षटकाराच्या मदतीने २२५ च्या स्ट्राइक रेटनं ८१ धावा कुटल्या.