IPL 2025 VIDEO: MS धोनी बाद होताच तरुणीने कसाबसा आवरला राग, रिअँक्शन Viral

CSK Fan Girl Reaction viral video, MS Dhoni wicket, IPL 2025 VIDEO: धोनी बाद होताच तरुणीला खूप राग आला पण तिने कसाबसा स्वत:ला सावरलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:15 IST2025-03-31T13:14:32+5:302025-03-31T13:15:37+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 RR vs CSK Fan Girl Reaction viral after MS Dhoni got out in last over watch wicket video | IPL 2025 VIDEO: MS धोनी बाद होताच तरुणीने कसाबसा आवरला राग, रिअँक्शन Viral

IPL 2025 VIDEO: MS धोनी बाद होताच तरुणीने कसाबसा आवरला राग, रिअँक्शन Viral

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

CSK Fan Girl Reaction viral video, MS Dhoni wicket, IPL 2025 VIDEO: मुंबई इंडियन्सला सलामीच्या सामन्यात हरवल्यानंतर CSK चे गणित फिसकटले. पुढील सलग दोन सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानच्या संघाने चेन्नईला शेवटच्या षटकात पराभूत केले. नितीश राणाच्या ८१ धावांच्या जोरावर राजस्थानने १८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात CSK ला २० षटकांत १७६ धावाच करता आल्या. शेवटच्या षटकात चेन्नईला २० धावांची गरज होती. धोनी मैदानात होता. पण नेमका पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याच्या विकेटमुळे चाहत्यांचा हिरमोड झाला. त्यात एका तरुणीच्या रिअँक्शनचा व्हिडीओ फारच व्हायरल झाला.

१८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना ऋतुराज गायकवाड अर्धशतक ठोकून बाद झाला. त्यामुळे १६व्या षटकात धोनी मैदानात उतरला. रविंद्र जाडेजा आणि धोनी जोडीने चेन्नईला विजयी करण्यासाठी शेवटपर्यंत झुंज दिली. अखेरच्या षटकात CSKला २० धावांची गरज होती. धोनी स्ट्राईकवर होता, तेव्हा संदीप शर्माने त्याला पहिल्याच चेंडूवर बाद केले. धोनी बाद होताच तरुणीला खूप राग आला होता. पण तिने कसाबसा तिचा राग आवरला. तिच्या हाताच्या अँक्शनमुळे ही गोष्ट स्पष्ट दिसून येते. पाहा व्हिडीओ-

रियान परागने खेळला खास 'डाव'

रियान परागने राजस्थानसाठी शेवटचे षटक संदीप शर्माकडे सोपवले. संघाकडे जोफ्रा आर्चरचा पर्यायही होता. सीएसके विरुद्धच्या या सामन्यात आर्चरने पहिल्या तीन षटकांत शानदार गोलंदाजीदेखील केली होती. त्याने तीन षटकांच्या स्पेलमध्ये एका मेडन ओव्हरसह फक्त १३ धावा दिल्या होत्या आणि १ विकेटही घेतली होती. पण धोनी-जाडेजा दोघेही अनुभवी होते, आर्चरच्या वेगवान माऱ्यापुढे ते फारसे घाबरले नसते. रियान परागने संदीपची निवड केली. कारण तो वेगवान चेंडूंसोबतच स्लो चेंडूही टाकू शकतो. तो गोलंदाजीत चांगले मिश्रण करतो. त्याने धोनीची विकेट घेत त्याची उपयुक्तता सिद्धदेखील केली. शेवटच्या टप्प्यात मोठे फटके मारण्याची क्षमता असलेल्या धोनीला संदीप शर्माने स्लोवर बॉल टाकून पहिल्याच चेंडूवर झेलबाद केले.

 

Web Title: IPL 2025 RR vs CSK Fan Girl Reaction viral after MS Dhoni got out in last over watch wicket video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.