Join us

IPL 2025 : CSK च्या नव्या हिरोनं ट्रेलर दाखवलाय; पण पिक्चर अजून बाकी!

CSK च्या या नव्या हिरोमध्ये ब्लॉकबस्टर शो देण्याची क्षमता आहे. उर्वरित सामन्यात तो हा डाव साधणार का? यावरही सर्वांच्या नजरा असतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:58 IST

Open in App

IPL 2025 RR vs CSK 62nd Match Player to Watch Urvil Patel Chennai Super Kings : सर्वाधिक वेळा प्लेऑफ्स खेळण्यासोबतच मुंबई इंडियन्सच्या बरोबरीनं सर्वाधिक ५ वेळा आयपीएल जेतेपद पटकवणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ यंदाच्या हंगामात फ्लॉप ठरला. गुणतालिकेत तळाला असलेल्या संघाने आता आगामी हंगामाची तयारी सुरु केलीये. स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आल्यावर या संघातून काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली असून या प्रयोगात काही चेहऱ्यांनी लक्षवेधी कामगिरी करून CSK ताफ्यातील प्रमुख खेळाडू होण्याची धमक दाखवून दिलीये. त्यातीलच एक चेहरा म्हणजे उर्विल पटेल. पदार्पणाच्या सामन्यात छोट्याखानी खेळीसह त्याने जबरदस्त ट्रेलर रिलीज केलाय. CSK च्या या नव्या हिरोमध्ये ब्लॉकबस्टर शो देण्याची क्षमता आहे. उर्वरित सामन्यात तो हा डाव साधणार का? यावरही सर्वांच्या नजरा असतील.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 संघातील कमी या पठ्ठ्यानं पदार्पणाच्या सामन्यातच भरून काढली

उर्विल पटेल याने पदार्पणाच्या सामन्यात ३१ धावांची खेळी करताना १ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने २८१.८२ च्या स्ट्राइक रेटनं धावा कुटल्याचे पाहायला मिळाले. उजव्या हाताचा हा फलंदाज उत्तुंग फटकेबाजी करून प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचे खांदे पाडण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघात ज्या अप्रोचची कमी दिसली ती या नव्या भिडूनं पहिल्याच सामन्यात भरून काढली. आगामी हंगामाचा विचार करता हा खेळाडू CSK साठी फायद्याचा सौदा ठरू शकतो. 

कोण आहे Urvil Patel? पदार्पणाच्या सामन्यात ११ चेंडूत ४ षटकार मारत सेट केला खास रेकॉर्ड

 विकेट किपर बॅटरच्या रुपातही ठरू शकतो सर्वोत्तम पर्याय

CSK च्या संघाकडून महेंद्रसिह धोनी आणखी किती हंगाम खेळणार? या प्रश्नाच उत्तर अजूनही गुलदस्त्यातच आहे. संघाला विकेटमागचा त्याचा सर्वोत्तम पर्याय शोधण्याचंही एक चॅलेंज आहे. उर्विल पटेलच्या रुपात संघाला हा देखील एक पर्याय मिळाला आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारा हा गडी प्रॉपर विकेट किपर आहे. मॅच विनिंग खेळीसह विकेटमागची जबाबदारी बजावण्याच्या दुहेरी क्षमतेमुळे आगामी काळात तो चेन्नई सुपर किंग्जसाठी मोलाचा खेळाडू ठरू शकतो. उर्वरित दोन सामन्यात तो संघासाठी कसे योगदान देणार ते पाहण्याजोगे असेल.

फक्त ट्रेलर दिसलाय, पिक्चर अजून बाकी...

गत वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-२० स्पर्धेत उर्विल पटेल याने धमाकेदार कामगिरीचा नजराणा पेश केला होता. २६ वर्षीय क्रिकेटरनं गुजरातकडून खेळताना त्रिपुराविरुद्ध २८ चेंडूत शतक झळकवल्याचे पाहायला मिळाले होते. या खेळीसह टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद शतक साजरे करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला होता. याशिवाय उत्तराखंड विरुद्धही त्याच्या भात्यातून ३६ चेंडूत शतक आल्याचे पाहायला मिळाले होते. त्याची ही कामगिरी IPL मधील पदार्पणाची खेळी ही फक्त ट्रेलर होती अन् पिक्चर असून बाकी आहे, असे म्हणायला लावणारीच आहे. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीराजस्थान रॉयल्स