IPL 2025 RR vs CSK 62nd Match Player to Watch Kwena Maphaka Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ६२ वा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघ १२ सामन्यानंतर प्रत्येकी ६-६ गुणांसह गुणतालिकेत तळाला आहेत. त्यामुळे दोन्ही संघातील लढाई त्या त्या संघासाठी प्रतिष्ठेसाठीची लढाई असेल. याशिवाय दोन्ही संघातील नवे चेहेरे आपली छाप सोडण्यासाठी मैदानात उतरतील. राजस्थानच्या संघाने दुखापतीमुळे माघार घेतलेल्या जोफ्रा आर्चरच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या क्वेना मफाका (Kwena Maphaka) याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. १९ वर्षीय जलदगती गोलंदाज उर्वरित सामन्यात आपल्या भेदक माऱ्याने प्रतिस्पर्धी संघातील बॅटरमध्ये दहशत निर्माण करणार का ते पाहण्याजोगे असेल. जाणून घेऊयात या युवा जलदगती गोलंदाजासंदर्भातील खास गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
MI कडून खेळताना महागडा ठरला, तरी राजस्थाननं मोजली मोठी किंमत
क्वेना मफाका या जलदगती गोलंदाजाने गत हंगामात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. ७५ लाख या प्राइज टॅगसह तो मुंबईच्या ताफ्यातून खेळताना दिसला. गत हंगामात २ सामन्यात त्याने ८९ धावा खर्च केल्या होत्या. यात त्याला फक्त एक विकेट मिळाली होती. आयपीएलच्या मेगा लिलावात राजस्थानच्या संघाने ७५ लाख मूळ किंमत असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या युवा गोलंदाजासाठी १.५० कोटी एवढी मोठी रक्कम मोजली आहे. राजस्थानकडून पदार्पण करताना त्याने ३ षटकात ३२ धावा खर्च करून एक विकेट घेतली. ३ सामन्यात त्याच्या खात्यात आयपीएलमध्ये आता २ विकेट्स जमा झाल्या आहेत.
IPL 2025 : CSK च्या नव्या हिरोनं ट्रेलर दाखवलाय; पण पिक्चर अजून बाकी!
सातत्यपूर्ण वेगवान मारा करण्याची क्षमता
क्वेना मफाका (Kwena Maphaka) हा दक्षिण आफ्रिकेकडून १ कसोटी २ वनडे आणि ५ टी-२० सामने खेळला आहे. मुंबई इंडियन्सकडून महागडा ठरल्यावरही राजस्थानच्या संघाने त्याच्यावर मोठी बोलू का लावली? हा प्रश्न काही क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो. पहिली गोष्ट तो फक्त १९ वर्षांचा आहे. या गोलंदाजामध्ये सातत्यपूर्ण १५० kmph एवढ्या वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्यामुळेच राजस्थानच्या संघाने या युवा खेळाडूवर भरवसा दाखवलाय.
क्वेना मफाकाचे टी २० कारकिर्द
क्वेना मफाका याने आतापर्यंत ३२ टी २० सामन्यातील ३२ डावात २६ च्या सरासरीने ३६ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. १८ धावा खर्च करून ४ विकेट्स ही त्याची टी-२० कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. अनुभवासह त्याच्या गोलंदाजीत आणखी धार दिसेल, अशी अपेक्षा आहे.
Web Title: IPL 2025 RR vs CSK 62nd Match Lokmat Player to Watch Kwena Maphaka Rajasthan Royals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.