शेवटच्या क्षणी आरसीबीने कर्णधारच बदलला; नाणेफेकीसाठी आलेल्या खेळाडूला पाहून पॅट कमिन्स शॉक!

RCB vs SRH: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आगळावेगळा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 19:57 IST2025-05-23T19:56:46+5:302025-05-23T19:57:51+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad | शेवटच्या क्षणी आरसीबीने कर्णधारच बदलला; नाणेफेकीसाठी आलेल्या खेळाडूला पाहून पॅट कमिन्स शॉक!

शेवटच्या क्षणी आरसीबीने कर्णधारच बदलला; नाणेफेकीसाठी आलेल्या खेळाडूला पाहून पॅट कमिन्स शॉक!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आगळावेगळा निर्णय घेतला. आरसीबीने हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी आपला कर्णधारच बदलला. आरसीबीने नाणेफेकीसाठी कर्णधार रजत पाटीदार ऐवजी दुसऱ्या खेळाडूला पाठवल्याने मैदानातील प्रेक्षकासह हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सही आश्चर्यचकीत झाला. 

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आरसीबीने नाणेफेकीसाठी रजत पाटीदारऐवजी संघाचा फलंदाज जितेश शर्माला पाठवले. हे दृश्य आरसीबीच्या चाहत्यांसाठी आश्चर्यचकीत करणारे ठरले. नाणेफेकीसाठी विराटलाही पाठवले जाऊ शकले असते. परंतु, आरसीबीने तसे केले नाही. आयपीएलने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आरसीबीकडून जितेश शर्मा नाणेफेकीला आल्याचे दिसत आहे. 

आरसीबीचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. तर, हैदराबादचा संघ या आयपीएलमधून बाहेर पडला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत टॉप-२ मध्ये राहण्यासाठी आरसीबीचा संघ हैदराबादविरुद्ध मैदानात उतरेल. आरसीबीने हा सामना जिंकला तर त्यांचे १९ गुण होतील. सध्याच्या घडीला पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर गुजरात टायटन्सचा संघ आहे. गुजरातचे १८ गुण आहेत. त्यामुळे आरसीबीसाठी हा सामना महत्वाचा असेल.

आरसीबीची कामगिरी
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आरसीबीने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. आरसीबीने आतापर्यंत खेळलेल्या १२ पैकी आठ सामने जिंकले आहेत. तर, तीन सामन्यात त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. आरसीबीचा एक सामना पावसामुळे वाया गेला. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा (कर्णधार आणि विकेटकीपर), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, लुंगी एनगिडी, सुयश शर्मा.
इम्पॅक्ट प्लेअर: रजत पाटीदार, रसिक दार सलाम, जेकब बेथेल, मनोज भंडागे, स्वप्नील सिंग

सनरायझर्स हैदराबाद:
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, एशान मलिंगा.
इम्पॅक्ट प्लेअर: मोहम्मद शमी, हर्ष दुबे, सचिन बेबी, झीशान अन्सारी, सिमरजीत सिंग

Web Title: IPL 2025 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.