Join us

IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?

BCCI Robo Dog Champak, High Court Notice: या रोबो डॉगचे नाव चंपक असं ठेवण्यात आलं आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 17:12 IST

Open in App

BCCI Robo Dog Champak, High Court Notice: IPL मध्ये दरवर्षी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न असतो. पण बरेचदा या नाविन्याच्या शोधात बीसीसीआयला अडचणींचा सामना करायची वेळ येते. IPL 2025 दरम्यानही अशीच अडचण उद्भवली आहे. बीसीसीआयला त्यांच्या रोबोट कुत्र्यामुळे नोटीस मिळाली आहे. दिल्लीउच्च न्यायालयाने बीसीसीआयला ही नोटीस पाठवली आहे. बीसीसीआय IPL 2025च्या सामन्यांमध्ये कुत्र्यासारखा दिसणारा रोबोट वापरत आहे. तो टॉस दरम्यान दिसतो आणि खेळाडूंच्या सरावादरम्यानचे क्षणही टिपतो. या कुत्र्याचे नाव चंपक ठेवण्यात आले आहे आणि इथेच बीसीसीआयला अडचणीचा सामना करावा लागला आहे.

दिल्लीउच्च न्यायालयाकडून 'बीसीसीआय'ला नोटीस

दिल्ली उच्च न्यायालयाने बीसीसीआयला नोटीस पाठवली आहे. लहान मुलांच्या एका प्रसिद्ध मासिकाचे नाव देखील चंपक आहे आणि म्हणूनच या कंपनीने बीसीसीआयची तक्रार केली आहे, त्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाला नोटीस पाठवण्यात आली आहे. चंपक मॅगझिन प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने बीसीसीआयकडून उत्तर मागितले आहे. बीसीसीआयला पुढील चार आठवड्यात लेखी उत्तर द्यावे लागेल आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जुलै रोजी होईल. बीसीसीआयवर त्यांच्या रोबोट कुत्र्याचे नाव चंपक ठेवून नोंदणीकृत ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

चंपक या रोबोट कुत्र्याची वैशिष्ट्ये काय?

चंपक या रोबोट डॉगची खासियत म्हणजे त्यात अनेक कॅमेरे आहेत. तो सामन्यादरम्यान चाहत्यांना वेगवेगळ्या अँगलने सामन्यातील क्षण दाखवू शकतो. याशिवाय, या रोबोटच्या आत अनेक प्रकारचे सेन्सर बसवलेले आहेत. ते खेळाडूंच्या कामगिरीचा डेटा देखील सेव्ह करू शकते. रोबो डॉग चंपकचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याला चार्ज करण्याची गरज नाही, ते आपोआप चार्ज होते. याचा वापर सामन्यापूर्वी, खेळाडूंच्या सरावादरम्यान आणि हाफ टाइम दरम्यान केला जातो. विशेष म्हणजे हा रोबोट कुत्रा जे काही फोटो आणि व्हिडिओ काढतो, ते तो थेट सोशल मीडियावरही अपलोड करू शकतो.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५बीसीसीआयदिल्लीउच्च न्यायालय