RR vs LSG : इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील ३६ व्या सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात खेळवण्यात आला. जयपूरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत रियान पराग पुन्हा संघाचे नेतृत्व करताना दिसला. रिषभ पंतने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पण या सामन्यात दोन वेळा टॉस झाला. नेमकं काय घडलं? मॅच वेळी दोन वेळा टॉस करण्याची का आली वेळ? जाणून घेऊया सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रियान परागनं नाणे हवेत उंचावले, पण...
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याने टॉस वेळी नाणे उंचावले. पण रिषभ पंतने छापा किंवा काटा काहीच मागितले नाही. त्यानंतर दोघांच्यात संवाद झाला अन् पुन्हा टॉस करण्याची वेळ आली. दुसऱ्यांदा टॉस झाल्यावर पंतने काटा मागितला अन् लखनौच्या संघाने टॉस जिंकला.
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
पंतला खटकली ही गोष्ट
रियान परागने नाणे हवेत उंचावले,पण पंतने छापा किंवा काटा यापैकी काहीच मागितले नाही. यानंतर दोन्ही कर्णधारांसह मॅच रेफ्री प्रकाश भट्ट यांनाही नेमकं काय घडलं ते समजले नाही. मग पराग आणि पंत एकमेकांसोबत मजाक मस्ती करताना दिसले. ‘तूने ऐसे ही फेंक दिया?’ असे म्हणत पंतने परागची चूक काढल्याचे दिसले. नाणे उंचावताना ते स्पिन व्हायला हवे. पण तू ते तसेच फेकलेस असे पंतला म्हणायचे होते. त्यामुळेच त्याने काहीच न मागता पुन्हा टॉस करायला भाग पाडले.