आयपीएल १० फ्रँचायझी संघ आणि स्पर्धेसाठी मैदानात उतरणारे खेळाडू यंदाच्या हंगामात मैदान गाजवण्यासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी एका बाजूला खेळाडू नेट्समध्ये कसून सराव करताना दिसते. दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचा माहोल खास करणाऱ्या काही जाहिरातीही चर्चेत आहेत. यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्याचे नेतृत्व करणाऱ्या रिषभ पंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यात तो लिटल मास्टर गावसकरांची नक्कल करताना दिसून येते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गावसकरांनी काढली होती अक्कल, आता पंतनं तो सीन क्रिएट करत केली त्यांचीच नक्कल
रिषभ पंत हा आक्रमक अंदाजात फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील चौथ्या कसोटी सामन्यात गावसकरांनी या युवा विकेट किपर बॅटरची शाळा घेतल्याचे पाहायला मिळेल होतो. नको त्या वेळी आक्रमक फटका मारण्याच्या नादात पंत झेल बाद झाल्यावर गावसकरांनी पंतवर नाराजी व्यक्त करताना "स्टुपिड स्टुपिड स्टुपिड" असं म्हणत संताप व्यक्त केला होता. समालोचन करताना त्यांच्या तोंडून निघालेले शब्द चांगले गाजले. त्यांची ही कमेंट चांगलीच गाजली. एका ब्रँडच्या जाहिराती वेळी पंतनं तो गाजलेला क्षण रिक्रिएट करताना गावसकरांनी नक्कल केल्याचे दिसून येते. पंतचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं होतं? ज्यावरून गावसकरांनी पंतची घेतली होती शाळा
रिषबपंत हा फटकेबाजी खेळताना आउट झाला की, हा त्याचा नैसर्गिक खेळ आहे आणि तो त्याच पद्धतीने खेळतो, असे दाखले बऱ्याचदा दिले जातात. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील त्याचा खेळण्याचा अंदाज गावसकरांना चांगलाच खटकला होता. तुमच्यासाठी जिथं दोन क्षेत्ररक्षक लावले आहेत तिथेच तुम्ही फटका मारुन झेलबाद होणे हे विकेट फेकल्यासारखे आहे, अशा शब्दांत गावसकरांनी पंतनं निवडलेला फटका हा मूर्खपणाचा वाटतो, अशा आशयाची कमेंट केली होती. बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पंतच्या बेजबाबदार फटकेबाजीवर त्यांनी केलेली संतापजन टिपण्णी चांगलीच चर्चेचा विषय ठरली होती. आता मजेशीर अंदाज कॉमेंट्री वेळीचा तो क्षण रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.