IPL 2025 Rishabh Pant New Captain Of LSG : आयपीएल २०२५ च्या आगामी हंगामाआधी लखनऊ सुपर जाएंट्स संघानं आपल्या नव्या कर्णधाची नियुक्त केली आहे. अगदी अपेक्षेप्रमाणे आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या रिषभ पंतच्या खांद्यावर LSG च्या कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आलीये. आयपीएलच्या मेगा लिलावात लखनऊच्या संघानं तब्बल २७ कोटी रुपये खर्च करून रिषभ पंतला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आधी पैसा ओतला; सर्वाधिक बोली लावून LSG नं पंतला आपल्यात घेतला
दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं रिलीज केल्यावर २ कोटी एवढ्या मूळ किंमतीसह रिषभ पंत मेगा लिलावात उतरला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांनीही रिषभ पंतला आपल्या ताफ्यात घेण्याचा डाव खेळला. पण लखनऊ सुपर जाएंट्सच्या संघाने फायनल बाजी मारली. २७ कोटी रुपयांसह संघाने पंतला आपल्यात ताफ्यात सामील करून घेतले. एवढी मोठी बोली लागल्यावर तोच संघाचा कॅप्टन होणार हे जवळपास निश्चित होते. आता संघ मालक संजीव गोएंका यांनी संघाच्या जर्सी अनावरण कार्यक्रमात पंतकडे संघाची कॅप्टन्सी दिल्याची घोषणा केली. या कार्यक्रमात LSG संघाचा मार्गदर्शक झहिऱ खानही उपस्थितीत होता.
आता संघ मालक संजीव गोएंका यांनी त्याच्याकडे सोपवली संघाच्या कॅप्टन्सीची जबाबदारी
लखनऊ सुपर जाएंट्स संघाचे मालक संजीव गोयंका यांनी एका कार्यक्रमात रिषभ पंतकडे संघाचे नेतृत्व देत असल्याची घोषणा केली. या कार्यक्रमात रिषभ पंतही सहभागी झाला होता. स्फोटक विकेट किपर बॅटर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडेल, एवढेच नाही तर आयपीएलमध्ये तो सर्वात यशस्वी कर्णधार होईल, असा विश्वास यावेळी LSG संघ माल संजीव गोएंका यांनी व्यक्त केला आहे.