Join us

२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?

पहिल्या सामन्यात अडखळला, पण दुसऱ्या सामन्यात कडक फिफ्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 21:24 IST

Open in App

RCB Youngster Jacob Bethell Proves With Brilliant Fifty : बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात विराट कोहलीसोबत आरसीबीच्या डावाची सुरुवात करणाऱ्या जेकब बेथेल (Jacob Bethell) याने दमदार अर्धशतक झळकावले. त्याने तुफान फटकेबाजी केल्यामुळे RCB ला फिल सॉल्टची उणीव भासेल, ही चर्चा तर फिकी ठरलीच. पण ट्रॉफीचं स्वप्न साकार करण्यासाठी संघाला आणखी एक हिरो मिळाल्याची झलक त्याने आपल्या दिमाखदार खेळीसह दाखवून दिली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दुप्पट भाव अन् पैसा वसूल कामगिरी

आयपीएलच्या मेगा लिलावात १.२५ कोटी इतक्या बेस प्राइजसह नाव नोंदणी केलेल्या इंग्लंडच्या क्रिकेटरसाठी RCB नं २.६० कोटी एवढी मोठी बोली लावून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते.  दुप्पट भाव दिलेल्या या खेळाडूने दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावत फ्रँचायझीचा विश्वास सार्थ ठरवणारी खेळी करून दाखवली. याआधी दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने पदार्पण केले. पण या सामन्यात त्याला आपल्या खेळीतील धमक दाखवता आली नव्हती. पदार्पणाच्या सामन्यात एक चौकार आणि एका षटकारासह तो ६ चेंडूत १२ धावा करून तंबूत परतला होता. पण दुसऱ्या सामन्यात त्याने कडक अर्धशतकी खेळी करून दाखवत सॉल्टची कमी भरून काढल्याचे पाहायला मिळाले. 

विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...

कोण आहे जेकब बेथेल?

२१ वर्षीय जेकब बेथेल याचा जन्म बारबाडोस येथे झाला. वयाच्या ११ सप्टेंबर २०२४ रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातून त्याला इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. बेथेल हा आक्रमक फटकेबाजीशिवाय ऑफ स्पिन गोलंदाजीही करतो. १० टी-२० सामन्यात त्याने १४७.३७ च्या स्ट्राइक रेटनं २ अर्धशतकासह ११९ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये पहिले अर्धशतक झळकावत त्याने उर्वरित स्पर्धा गाजवण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत. फिल सॉल्ट परतल्यावर तो संघात कायम राहणार का? RCB चा संघ त्याचा कसा वापर करून घेणार ते पाहण्याजोगे असेल. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेन्नई सुपर किंग्सइंडियन प्रीमिअर लीग