IPL 2025 RCB vs PBKS Final Virat Kohli Wicket : आयपीएलच्या फायनलमध्ये विराट कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात फिल सॉल्टसोबत त्याने संघाच्या डावाला सुरुवात केली. सॉल्ट स्वस्तात माघारी फिरल्यावर विराट कोहली अगदी संयमी अंदाजात खेळताना दिसला. सेट झाल्यावर ज्यावेळी त्याने गियर बदलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तो फसला अन् फिफ्टी करण्याआधी त्याला माघारी फिरावे लागले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ओमरझाईचा आपल्याच गोलंदाजीवर सर्वोत्तम कॅच
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला हा मोठा धक्काच होता. १५ व्या षटकातील अझमतुल्लाह ओमरझाईनं टाकलेल्या आखूड टप्प्यावर कोहलीनं पूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण टाइमिंग चुकले अन् अफगाणिस्तानच्या गोलंदाजाने स्वत:च्या गोलंदाजीवर अप्रतिम झेल टिपत कोहलीच्या फायनलमधील इनिंगला ४३ धावांवरच ब्रेक लावला.
IPL 2025 Final : RCB चाहत्यांची 'विराट' लाट! अहमदाबादच्या स्टेडियम बाहेर उसळला 'लाल समुद्र'
अन् अनुष्काचा चेहरा पडला, तिची रिअॅक्शन होतीये व्हायरल
RCB vs PBKS
उमराझाईनं कॅच घेतल्यावर पंजाब किंग्जच्या ताफ्यात एकच जल्लोष पाहायला मिळाला. दुसरीकडे स्टँडमध्ये कोहलीला चीअर करण्यासाठी आलेल्या अनुष्का शर्माचा चेहरा पडला. किंग कोहलीच्या विकेटनंतर तिची रिअॅक्शन चर्चेचा विषय ठरत आहे.
कॉमेट्री बॉक्समध्ये एबीही झाला हताश
दक्षिण आफ्रिकेचा आणि RCB चा माजी क्रिकेटर एबी डिव्हिलियर्स खास आरसीबी फायनलमध्ये पोहचल्यामुळे भारतात आलाय. फायनल सामन्यावेळी तो कॉमेंट्री पॅनलमध्ये गप्पा गोष्टी करत सामन्याचा आनंद घेताना दिसून आले. विराट कोहलीची विकेट पडल्यावर तो निराश झाल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीची विकेट ही फायनलमध्ये निकाल ठरवणारी आहे, याची कल्पना असल्यामुळेच तो कोहलीच्या शॉटवर निराशा व्यक्त करताना दिसून आले. त्याचा व्हिडिओही चर्चेचा विषय ठरतो.
आरसीबीच्या संघ १९० धावांपर्यंतच पोहचला
आरसीबीच्या ताफ्यातून विराट कोहलीनं ३५ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. संघाकडून कोणत्याही खेळाडूनं केलेली ही सर्वोच्च खेळी ठरली. आरसीबीच्या ताफ्यातील प्रत्येक खेळाडूनं चांगली सुरुवात केली. पण त्या खेळीचं मोठ्या खेळीत रुपांत करण्यात एकालाही यश आले नाही. परिणामी आरसीबीचा संघ निर्धारित २० षटकात ९ बाद १९० धावंपर्यंतच मजल मारू शकला.
Web Title: IPL 2025 RCB vs PBKS Final Virat Kohli Dismissed Azmatullah Omarzai Stunning Catch Anushka Sharma Ab Devillers Reaction Goes Viral Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.