IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO)

या विकेटनंतर जेमिसन याने आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केल्याचेही पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 21:16 IST2025-06-03T21:15:01+5:302025-06-03T21:16:26+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 RCB vs PBKS Final Rajat Patidar Hits A Six Next Ball Kyle Jamieson Dismissed Him Watch Video | IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO)

IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 RCB vs PBKS Final Rajat Patidar vs Kyle Jamieson  : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील फायनल सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कायले जेमिसन याने आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत दुसऱ्याच षटकात फिल सॉल्टच्या रुपात  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पहिला धक्का दिला. RCB चा स्फोटक फलंदाज ९ चेंडूत १६ धावा करून तंबूत परतला. संघाला पहिली विकेट मिळवून देणाऱ्या जेमिसन याने सेट होत असलेल्या RCB च्या कर्णधाराला माघारी धाडत संघालाला आणखी एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

रजत पाटीदारची विकेट अन् जेमिसनचे सेलिब्रेशन

फिल सॉल्ट याची जागा घेण्यासाठी आलेल्या मयंक अग्रवालनं विराटसोबत ३८ धावांची भागीदारी रचली. पण चहलनं त्याला २४ धावांवर चालते केले. संघ अडचणीत असताना मैदानात उतरलेला रजत पाटीदार याने तेवर दाखवले. तो विराटला साथ देईल असे वाटत होते. पण जेमिसनच्या गोलंदाजीवर तो फसला. ११ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर एका सुंदर यॉर्कर लेंथ चेंडूवर जेमिसन याने त्याची विकेट घेतली. या विकेटनंतर जेमिसन याने आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केल्याचेही पाहायला मिळाले. कारण याआधी पाटीदारनं त्याला कडक षटकार मारला होता.

IPL 2025 Final : RCB चाहत्यांची 'विराट' लाट! अहमदाबादच्या स्टेडियम बाहेर उसळला 'लाल समुद्र'

जेमिसनच्या अप्रतिम यॉर्कर लेंथ चेंडूवर फुटली विराट-रजत जोडी

आरसीबच्या संघाने फायनल सामन्यात ५६ धावांवर दुसरी विकेट गमावल्यावर रजत पाटीदारनं विराट कोहलीसोबत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. ही भागीदारी अर्धशतकाकडे वाटचाल करताना दिसली.  पण रजत पाटीदार १६ चेंडूत २६ धावांवर जेमिसनच्या यॉर्करवर फसला. त्याने तिसऱ्या विकेटसाठी विराटच्यासाथीनं ४० धावांची भागीदारी रचली. जेमिसन घेऊन आलेल्या ११ व्या षटकात उत्तुंग षटकार मारत रजत पाटीदारनं आपले तेवर दाखवले. पण पुढचा चेंडू निर्धाव टाकत पाचव्या चेंडूवरील परफेक्ट यॉर्कवर जेमिसनने षटकार मारल्याचा बदला घेतला.

 

Web Title: IPL 2025 RCB vs PBKS Final Rajat Patidar Hits A Six Next Ball Kyle Jamieson Dismissed Him Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.