IPL 2025 RCB vs PBKS 34th Match Arshdeep Singh Record : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ३४ व्या सामन्यात दोन्ही संघ मैदानात उतरण्याआधी पावसाने बॅटिंग केली. परिणामी हा सामना प्रत्येकी १४-१४ षटकांचा खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर अर्शदीप सिंगनं पंजाबच्या संघाला दमदार सुरुवात करून देत आपल्या पहिल्या दोन षटकात दोन्ही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवला. या दोन विकेट्स घेत अर्शदीपनं खास विक्रमाला गवसणी घातली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोहलीच्या विकेटसह अर्शदीपच्या नावे 'विराट' विक्रम
टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या अर्शदीप सिंगनं आयपीएलमध्ये पंजाबकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. विराट कोहलीची विकेट घेत त्याने हा मोठा विक्रम आपल्या नावे करताना माजी फिरकीपटू पियूष चावला याचा विक्रम मोडीत काढला.
IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं
पंजाब किंग्जकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला अर्शदीप सिंग
अर्शदीप सिंगनं पंजाब किंग्जकडून आतापर्यंत ८५ विकेट्स घेतल्या आहेत. ७२ सामन्यात तो पंजाबकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरलाय. पियूष चावलाने ८७ सामन्यात पंजाबकडून ८४ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत संदीप शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ६१ सामन्यात पंजाबकडून ७३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
आरसीबीकडून टीम डेविड एकटा लढला, पण...
अर्शदीप सिंगनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पहिल्याच षटकात स्फोटक फलंदाज फिल साल्टला आपल्या जाळ्यात अडकवले. त्याने ४ चेंडूत ४ धावा करून तंबूत परतला. आरसीबीच्या डावातील तिसऱ्या आणि आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकात अर्शदीप सिंगनं कोहलीच्या रुपात आणखी एक विकेट आपल्या खात्यात जमा केली. त्याने ३ षटकात २६ धावा खर्च केल्या. दुसऱ्या बाजूला टीम डेविड एकटा लढला अन् त्याने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर १४ षटकांच्या सामन्यात आरसीबीच्या संघाने धावफलकावर ९५ धावा लावल्या. ही धावसंख्या आरसीबीच्या संघाला सामना जिंकण्यासाठी पुरेशा ठरली नाही. पंजाबच्या संघाने ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला.