Jitesh Sharma MS Dhoni, IPL 2025 RCB vs LSG: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाला ६ गडी राखून पराभूत केले. कर्णधार ऋषभ पंतने नाबाद ११८ धावा करून लखनौच्या संघाला २२७ धावांची मजल गाठून दिली. पण जितेश शर्माची नाबाद ८५ धावांच्यी खेळी पंतच्या शतकावर भारी पडली. जितेश शर्माने फटकेबाजीच्या जोरावर संघाला १८.४ षटकातच विजय मिळवून दिला. जितेशने केलेल्या दमदार नाबाद खेळीच्या जोरावर त्याने महेंद्रसिंग धोनी आणि किरॉन पोलार्ड यांचा विक्रम मोडला.
IPL च्या इतिहासात एवढी मोठी धावसंख्या फारच मोजक्या वेळेला यशस्वीपणे पार केली जाते. या सामन्यात RCB ने २२८ धावांचे आव्हान लीलया पार केले. या आव्हानाचा पाठलाग करताना सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या फलंदाजाने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम जितेश शर्माच्या नावे झाला. त्याआधी हा विक्रम धोनीच्या नावे होता. धोनीने २०१८ साली RCB विरूद्ध सहाव्या क्रमांकावर खेळताना ३४ चेंडूत ७० झाला केल्या होत्या. तर किरॉन पोलार्डने सहाव्या क्रमांकावर खेळताना ४७ चेंडूत ७० धावा केल्या होत्या. या साऱ्यांना जितेश शर्माने मागे टाकले.
दरम्यान, या सामन्यात ऋषभ पंतने अख्ख्या हंगामातील सर्वोत्तम खेळी केली. पण त्याला सामना जिंकता आला नाही. पंतच्या दमदार खेळीला लखनौच्या गोलंदाजांची आणि क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही. लखनौच्या खेळाडूंकडून अनेक वेळा झेल आणि रनआऊटच्या संधी हुकल्या. इतकेच नव्हे तर सामना संपल्यानंतर पंतला स्लो ओव्हर रेटमुळे ३० लाखांचा दंड भरावा लागला. तसेच इतर ११ खेळाडूंनाही १२ लाखांचा दंड ठोठवण्यात आला.