Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी

१८ नंबरच्या व्हाइट जर्सीत चाहत्यांनी स्टेडियमवर केलीये गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 20:19 IST

Open in App

Crickets Fans Special Tribute To Virat Kohli Pics Viral :  आयपीएल स्पर्धेतील १८ व्या हंगामाला सुधारित वेळापत्रकानुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील लढतीनं सुरुवात होत आहे. बंगळुरुच्या मैदानात रंगणाऱ्या या सामन्याआधी पावसाची बॅटिंग सुरु असल्यामुळे सामना वेळेत सुरु होऊ शकलेला नाही. पण चाहते अगदी वेळेत अन् ठरल्या प्रमाणे विराट कोहलीला खास सलाम देण्यासाठी स्टेडियमवर जमा झाले आहेत. या सामन्याआधी विराट कोहलीनं अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याचा हा निर्णय अनेक चाहत्यांना दर्दी करणारा होता. कोहिलाच्या निर्णयामुळे दर्दी झालेला चाहत्यांनी कोहलीसाठी व्हाइट जर्सीत एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गर्दी केली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

१८ नंबरच्या व्हाइट जर्सीत चाहत्यांनी स्टेडियमवर केलीये गर्दी 

आरसीबीचा सामना असला की, बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर लाल रंगातील माहोल दिसून येतो. पण कोहलीनं कसोटीतून निवृत्ती घेतल्यावर सोशल मीडियावर एक खास मोहिम राबवण्यात आली. कोहलीला खास अंदाजात फेअरवेल देण्यासाठी चाहत्यांनी व्हाइट जर्सी घालून स्टेडियमवर जमण्याची विनंती करण्यात आली. ही मोहिम फत्ते झाल्याचे चित्र RCB vs KKR यांच्यातील सामन्याआधी पाहायला मिळाली. बच्चे कंपनीसह मोठ्या संख्येनं बंगळुरुच्या स्टेडियमवर पोहचलेल्या चाहत्यांनी १८ नंबरची व्हाइट जर्सी घालून स्टेडियममध्ये एन्ट्री मारली.  

Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतो...

किंग कोहलीसाठी स्टेडियममवर खास माहोल

विराट कोहलीसाठी चाहत्यांनी  स्टेडियमवर व्हाइट जर्सीत केलेल्या गर्दीचे खास फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. महान क्रिकेटरवरील प्रेमाचा एक खास नजराणाच चाहत्यांनी बंगळुरुच्या मैदानात पेश केला आहे. विराट कोहली १४ वर्षांच्या आपल्या कसोटी कारकिर्दीत १२३ कसोटी सामने खेळला. कॅप्टन्सीतील त्याचा रेकॉर्ड असो किंवा वैयक्तिक कामगिरी ही अविश्वसनीय राहिलीये.  त्याच्या अविस्मरणीय योगदानासाठी चाहत्यांनी बंगळुरुच्या स्टेडियमवर तयार केलेला खास माहोल हा लक्षवेधी असाच आहे. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्स