IPL 2025 RCB vs KKR 58th Match Player To Watch Vaibhav Arora Kolkata Knight Riders : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 'जर-तर'च्या समीकरणात अडकला आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाने १२ सामन्यानंतर ५ विजय आणि एका अनिर्णित लढतीसह आपल्या खात्यात ११ गुण जमा केले आहेत. उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरी प्लेऑफ्ससाठी त्यांना अन्य संघाच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. याउलट एक पराभव त्यांचा यंदाच्या हंगामातील प्रवास संपुष्टात आणणारा ठरू शकतो. केकेआरच्या ताफ्यातून छाप सोडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वैभव अरोरा हा आघाडीवर आहे. जाणून घेऊयात त्याच्या कामगिरीसंदर्भातील खास स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
KKR च्या ताफ्यातील यशस्वी गोलंदाज ठरलाय वैभव
वैभव अरोरा हा कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा वरुण चक्रवर्ती पाठोपाठ दुसरा गोलंदाज ठरलाय. त्याने ११ सामन्यात १६ विकेट्स घेतल्या आहेत. वरुण चक्रवर्तीनं १२ सामन्यात १७ विकेट्स घेतल्या असून हर्षित राणानं एवढ्याच सामन्यात १५ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्यात. वैभव अरोरासाठी यंदाचा हंगाम खास राहिला. कारण त्याला अधिकाधिक संधी मिळाली अन् त्याने त्याचं सोनंही करून दाखवलं. ५ फूट १० इंच उंची असलेला हा गडी परफेक्ट बाउन्सरसह इन स्विंग-आउट स्विंगच्या कमालीच्या मिश्रणासह आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवण्यात यशस्वी ठरलाय. उर्वरित सामन्यात संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील.
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
कशी राहिलीये त्याची आयपीएल कारकिर्द?
वैभव अरोरा यानं आयपीएल कारकिर्दीची सुरुवात ही पंजाब किंग्जच्या ताफ्यातून केली होती. २०२१ च्या हंगामात २० लाख रुपयांसह तो पंजाबच्या ताफ्यात सामील झाला. २०२२ मध्ये त्याला पंजाबच्या संघाने २ कोटींसह आपल्या संघात कायम ठेवले. पहिल्या दोन हंगामात त्याला फारच कमी संधी मिळाली. परिणामी २०२३ मध्ये त्याचा भाव घसरला. केकेआरनं ६० लाख रुपयांसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. गत हंगामात याच किंमतीसह तो केकेआरकडून खेळला. यंदाच्या हंगामात केकेआरनं त्याच्यासाठी १ कोटी ८० लाख एवढी किंमत मोजली होती. आतापर्यंत ३१ सामन्यात त्याच्या खात्यात ३५ विकेट्स जमा आहेत. त्यातील १६ विकेट्स या यंदाच्या हंगामात त्याने घेतल्या आहेत. केकेआरचा संघ स्पर्धेत टिकणं अवघड असले तरी वैभव अरोरानं एक प्राइम बॉलरच्या रुपात आपली संघातील जागा फिक्स केलीये एवढ मात्र नक्की.
Web Title: IPL 2025 RCB vs KKR 58th Match Lokmat Player To Watch Vaibhav Arora Kolkata Knight Riders
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.