Join us

Phil Salt Run Out : विराटनं धाव घेण्यास दिला नकार; मागे फिरताना पाय घसरला अन् सॉल्ट झाला 'रन आउट'

सॉल्टनं रन आउटच्या रुपात आपली विकेट गमावल्याचे पाहायला मिळाले.  त्याने १७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ३७ धावा कुटल्या. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 20:44 IST

Open in App

बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील २४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून फिल सॉल्ट आणि विराट कोहली या जोडीनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. चौथ्या षटकाआधीच या जोडीनं धावफलकावर ६१ धावा लावल्या. पण सेट झालेली ही जोडी एकमेकांतील ताळमेळाच्या अभावामुळे फुटली. सॉल्टनं रन आउटच्या रुपात आपली विकेट गमावल्याचे पाहायला मिळाले.  त्याने १७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ३७ धावा कुटल्या. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

चौथ्या षटकातील पाचव्या चेंडूवर फुटली RCB ची सलामी जोडी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या डावातील चौथ्या षटकात अक्षर पटेल गोलंदाजी करत होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर सॉल्टनं कव्हरच्या दिशेनं चेंडू मारुन एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. कोहलीनं धाव घेण्यास नकार देत त्याला माघारी धाडले. मागे फिरताना तो घसरला अन् वीपराजनं या संधीच सोन करत केएल राहुलकडे अचूक थ्रो मारत त्याचा खेळ खल्लास केला.

Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२५ मधून बाहेर, पुन्हा धोनीकडे सीएसकेचे कर्णधारपद!

स्टार्कची धुलाई करत जबरदस्त स्टार्ट

सॉल्ट आणि विराट जोडीनं पहिल्या षटकात ७ धावा काडळ्यावर अक्षर पटेलच्या दुसऱ्या षटकात १६ धावा कुटल्या.  त्यानंतर स्टार्क घेऊन आलेल्या डावाच्या तिसऱ्या षटकात दोघांनी ३० धावा कुटल्या. यात सॉल्टनं २ षटकार आणि ३ चौकाराच्या मदतीने २४ धावा कुटल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय विराट कोहलीनं या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक चौकार मारल्याचे पाहायला मिळाले.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्सव्हायरल व्हिडिओ