IPL 2025 : अनुभवी भुवीची उंच उडी! RCB ला दमदार सुरुवात करून देताना साधला मोठा डाव

तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणाला जलदगती गोलंदाज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 22:27 IST2025-04-10T22:26:14+5:302025-04-10T22:27:10+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 RCB vs DC 24th Match Bhuvneshwar Kumar Has Become Third Bowler To Take Most Wickets In IPL History | IPL 2025 : अनुभवी भुवीची उंच उडी! RCB ला दमदार सुरुवात करून देताना साधला मोठा डाव

IPL 2025 : अनुभवी भुवीची उंच उडी! RCB ला दमदार सुरुवात करून देताना साधला मोठा डाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Bhuvneshwar Kumar Has Become Third Bowler To Take Most Wickets : बंगळुरुच्या मैदानात रंगलेल्या आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील २४ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातून खेळणाऱ्या भुवनेश्वर कुमारनं १६३ धावसंख्येचा बचाव करताना संघाला दमदार सुरुवात करून दिली. भारताच्या अनुभवी गोलंदाजाने पहिल्या ३ षटकात फक्त १४ धावा खर्च करत दोन विकेट्स घेतल्या. यासह भुवनेश्वर कुमार हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

भुवीनं अश्विनला टाकले मागे  

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्क याच्या रुपात भुवीनं या सामन्यात आपली पहिली विकेट घेतली. त्यानंतर अभिषेक पोरेल याला तंबूचा रस्ता दाखवत भुवीनं रविचंद्रन अश्विनला मागे टाकत आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचला. १८१ IPL सामन्यात त्याने १८६ विकेट आल्या खात्यात जमा करत हा खास विक्रम आपल्या नावे केला. याआधी तो ड्वेन ब्रावोचा विक्रम मागे टाकत आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा जलगती गोलंदाज ठरला होता.  

Phil Salt Run Out : विराटनं धाव घेण्यास दिला नकार; मागे फिरताना पाय घसरला अन् सॉल्ट झाला 'रन आउट'

युजवेंद्र चहलच्या नावे आहे सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा युजवेंद्र चहलच्या नावे आहे. त्याने १६४ सामन्यात आतापर्यंत २०६ विकेट्स घेतल्या आहेत. त्यापाठोपाठ या यादीत पियुष चावलाचा नंबर लागतो. त्याने १९२ सामन्यात १९२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. यंदाच्या हंगामात सातत्यपूर्ण कामगिरीसह भुवनेश्वर कुमार सर्वाधिक विकेट् घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कुठपर्यंत मजल मारणार ते पाहण्याजोगे असेल. 

IPL मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे आघाडीचे गोलंदाज

  • युजवेंद्र चहल १६४ सामन्यात २०६ विकेट्स
  • पियुष चावला १९२ सामन्यात १९२ विकेट्स
  • भुवनेश्वर कुमार १८१ सामन्यात १८६ विकेट्स
  • रविचंद्रन अश्विन २१७ सामन्यात १८५ वकेट्स
  • ड्वेन ब्रावो १६१ सामन्यात १८३ विकेट्स

Web Title: IPL 2025 RCB vs DC 24th Match Bhuvneshwar Kumar Has Become Third Bowler To Take Most Wickets In IPL History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.