IPL 2025 RCB vs DC : ज्या बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर विराटसह अन्य स्टार फलंदाज संघर्ष करताना दिसले तिथं लोकल बॉल लोकेश राहुलनं आपला क्लास दाखवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सेट केलेल्या १६४ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने आघाडीच्या विकेट गमावल्यावर लोकेश राहुलनं ३७ चेंडूत अर्धशतक साजरे केले. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील केएल राहुलचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील १५ षटकात त्याने गियर बदलून केलेली खेळी त्याचा क्लास दाखवणारी होती. १४ व्या षटकात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ९९ षटकात ४ बाद ९९ धावा केल्या होत्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जोश हेजलवूडच्या षटकात गियर बदलून बॅटिंग करत दाखवला क्लास
पावसाचे संकेत दिसत असताना डकवर्थ लुईस प्रमाणे १५ षटकात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला ११५ धावा करायच्या होत्या. जोश हेजलवूड घेऊन आलेल्या १५ व्या षटकात केएल राहुलनं दोन चौकार आणि एका षटकारासह आधी हे टार्गेट पार करत दिल्ली कॅपिटल्सला मोठा दिलासा दिला. त्याचा या षटकात दिसलेला तोरा परिस्थितीनुसार खेळण्यासाठी एकदम सक्षम असल्याची झलक दाखवून देणारा होता. सामन्यात पासाचा व्यत्यय आला नाही. पण लोकेश राहुल विराटच्या आरसीबीच्या विजयाआड आला. त्याने सिक्सर मारत संघाला मॅच जिंकूनही दिली.
Virat Kohli 1000 Boundaries Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
संघ संकटात असताना केएल राहुलची जबरदस्त खेळी, एकहाती फिरवला सामना
RCB नं सेट केलेल्या १६४ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. फाफ ड्युप्लेसिस २ (७) आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क ७ (६) आणि अभिषेक पोरेल ७(७) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरले. ३ बाद ३० धावा असताना केएल राहुललनं कर्णधार अक्षर पटेलसोबत डाव सावरला. पण ही जोडी फुटली. धावफलकावर ५८ धावा असताना अक्षर पेटलनं १५ धावांवर तंबूचा रस्ता धरला. मॅच पुन्हा RCB च्या बाजून झुकतीये असे वाटत होते. पण लोकेश राहुलनं गियर बदलला. सलग दुसऱ्या अर्धशतकानंतर त्याने स्टब्सच्या साथीनं दमदार भागीदारी रचत १८ व्या षटकातच सिक्सर मारून संघाला विजय मिळवून दिला. लोकेश राहुलनं ५३ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने ९३ धावांची नाबाद खेळी केली. दुसऱ्या बाजूला ट्रिस्टन स्टब २३ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३८ धावांवर नाबाद राहिला.