बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात कोहलीनं खलील अहमदला दोन कडक षटकार मारत चेपॉकच्या मैदानात जे घडलं त्याचा बदला घेतल्याचे पाहायला मिळाले. कोहली पॉवर प्लेमध्ये फारसा आक्रमक खेळ करताना दिसत नाही. पण खलील अहमद घेऊन आलेल्या RCB च्या डावातील तिसऱ्या षटकात कोहलीने सलग दोन षटकार मारून त्याची ओव्हर संपवली. याआधी चेपॉकच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात खलील अहमदने कोहलीला ३ निर्धाव चेंडू टाकल्यावर खुन्नस दिल्याचे पाहायला मिळाले होते. याचा बदला घेत कोहलीनं सलग दोन षटकार मारत त्याची जिरवल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोहलीनं जिरवली, मग खलील अहमदनं असा काढला राग
पहिल्या षटकात १३ आणि दुसऱ्या षटकात १९ धावा खर्च केल्यावर महेंद्रसिंह धोनीने खलील अहमदचा स्पेल तिथंच थांबवला. पण तो गोलंदाजीला नसताना पुन्हा त्याने किंग कोहलीविरुद्ध पंगा घेतल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहली अर्धशतक झळकावल्यावर ६२ धावांवर झेलबाद झाला. सॅम कुरेनच्या गोलंदाजीवर त्याचा कॅच नेमका खलील अहमदने टिपला. हा कॅच घेतल्यावर त्याने कोहलीनं मारलेल्या दोन षटकारांचा अन् चेपॉकच्या मैदानात घडलेल्या गोष्टीचा रागच काढल्याचे पाहायला मिळाले. चेंडू जमिनीवर आपटून आक्रमक अंदाजात त्याने सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
गोलंदाजीतील धार न दिसल्यामुळे झाली फजिती
खलिल अहमदचा हा तोरा म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर रुबाब झाडण्यातला प्रकारच होता. कोहलीचा कॅच घेतल्यावर त्याची सुटका झाली, असे काहीचे चित्रही निर्माण झाले होते. दुसऱ्याच्या जीवावर आपल्या मनातला राग काढणाऱ्या खलील अहदमची मग रोमारियो शेफर्डनं हवाच काढली. १९ व्या षटकात बंगळुरुच्या मैदानात RCB च्या ताफ्यातील रोमारियो शेफर्ड नावाचं वादळ घोंगावलं. त्याने खलील अहमदच्या षटकात ३ षटकार आणि २ चौकारांसह एकूण ३३ धावा कुटल्या. यासह यंदाच्या हंगामातील सर्वात महागडे षटक टाकण्याचा विक्रम खलील अहमदच्या नावे झाला. ३ षटकात त्याने एकही विकेट न घेता ६५ धावा खर्च केल्या. कोहलीच्या विकेटचे सेलिब्रेशन केल्यावर त्याची फजितीच झाल्याचे दिसून आले.