आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आरसीबीच्या संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. गुणतालिकेत आरसीबीचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. लवकरच प्लेऑफच्या सामन्याला सुरुवात होईल. परंतु, त्याआधी आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारच्या दुखापतीने संघाचे टेन्शन वाढवले होते. पण आता संघाचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी पाटीदार याने दुखापतीवर मात केल्याची माहिती दिली.
अँडी फ्लॉवर म्हणाले की,"आरसीबीच्या संघाने आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात पाटीदारच्या बोटाला दुखापत झाली होती. मात्र, आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. ही चांगली गोष्ट आहे. याशिवाय, सलामीवीर फिल सॉल्ट हा देखील दुखापतीतून सावरला आहे. दोन्ही खेळाडू आरसीबीच्या आगामी सामन्यात खेळताना दिसतील.
आरसीबीला आता सर्व सामने त्यांच्या मैदानाबाहेर खेळावे लागतील. आरसीबी आणि हैदराबाद यांच्यात उद्या खेळला जाणारा सामना पावसामुळे लखनौमध्ये होणार आहे. यावर बोलताना अँडी फ्लॉवर म्हणाले की, "उद्याचा सामना बंगळुरूऐवजी दुसऱ्या मैदानावर खेळला जाणार आहे. पण इतर मैदानांवर आमचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे आणि मला आशा आहे की संघ उद्या चांगला खेळ दाखवेल."
गुणतालिकेत आरसीबीचा संघ दुसऱ्या स्थानावर
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या आरसीबीच्या संघाने आतापर्यंत खेळलेल्या १२ पैकी आठ सामने जिंकले आहेत. आरसीबीचा संघ १७ गुणांसह (+0.482) गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Web Title: IPL 2025: RCB Head Coach Andy Flower's Massive Update On Rajat Patidar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.