IPL 2025: दोन दिग्गजांचे होणार संघात 'कमबॅक'; PBKS vs RCB सामन्याची वाढणार चुरस

Two Big Players Comeback, IPL 2025 Qualifier 1 PBKS vs RCB: आजपासून प्लेऑफ फेरीच्या सामन्यांना सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:45 IST2025-05-29T12:45:08+5:302025-05-29T12:45:52+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 Qualifier 1 PBKS vs RCB two star match winning players may comeback for thrilling contest Josh Hazlewood Yuzvendra Chahal | IPL 2025: दोन दिग्गजांचे होणार संघात 'कमबॅक'; PBKS vs RCB सामन्याची वाढणार चुरस

IPL 2025: दोन दिग्गजांचे होणार संघात 'कमबॅक'; PBKS vs RCB सामन्याची वाढणार चुरस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Two Big Players Comeback, IPL 2025 Qualifier 1 PBKS vs RCB: यंदाच्या प्लेऑफ फेरीतील पहिला क्वालिफायर सामना आज गुणतालिकेतील दोन अव्वल संघ, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. टॉप-२ मध्ये स्थान मिळवल्यानंतर दोन्ही संघांना हा सामना खेळायची संधी मिळाली आहे. या सामन्यात दोन्ही संघ जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. पण पराभव झालेल्या संघासाठी अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी असणार आहे. तशातच दोन्ही संघासाठी आणखी एक खुशखबर म्हणजे दोघांचेही दिग्गज गोलंदाज संघात पुनरागमन करण्यास सज्ज आहेत.

पंजाबचा धुरंधर परतणार...

पंजाब किंग्जने २०१४ नंतर प्रथमच प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब चांगल्या लयीत खेळत आहे. पंजाबचे सलामीवीर फलंदाज प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य उत्तम फॉर्ममध्ये आहेत. जोस इंग्लिश आणि अय्यर यांनी मधल्या फळीत शानदार फलंदाजी केली आहे. गेल्या सामन्यात इंग्लिशने शानदार कामगिरी केली. अर्शदीप सिंग गोलंदाजीत चांगल्या लयीत आहे. तर युजवेंद्र चहल हा दुखापतीनंतर फिट असून प्लेऑफमध्ये पुनरागमन करू शकतो.

RCB चा वेगवान मोहरा येणार...

बंगळुरूसाठी देखील हा टप्पा नवीन नाही. परंतु यावेळी त्यांना हा टप्पा ओलांडून जेतेपदाचा दुष्काळ संपवायचा आहे. विराट कोहली आणि फिल सॉल्ट दमदार खेळी करत आहेत. चांगली गोष्ट म्हणजे जितेश शर्मा फॉर्ममध्ये परतला आहे. गेल्या सामन्यात जितेशने आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली आणि मधल्या फळीला बळकटी दिली. आरसीबीने लीग टप्प्यात पंजाबला या मैदानावर पराभूत केले, त्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावलेले आहे. तशातच त्यांच्याकडून जोश हेझलवूड या सामन्यात पुनरागमन करू शकतो.

IPL मध्ये कोण कुणावर भारी?

आयपीएलच्या इतिहासात, आरसीबी आणि पंजाब यांच्यात आतापर्यंत ३५ सामने खेळले गेले आहेत. यापैकी आरसीबीने १७ वेळा सामना जिंकला आहे तर पंजाबच्या संघाने १८ वेळा सामना जिंकला आहे. पंजाबचा संघ केवळ एकाच विजयाने आघाडीवर आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून विजयाचे खाते बरोबरीत आणण्यासाठी RCB नक्कीच सज्ज आहे.

Web Title: IPL 2025 Qualifier 1 PBKS vs RCB two star match winning players may comeback for thrilling contest Josh Hazlewood Yuzvendra Chahal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.