Join us

RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील निकालाचा प्लेऑफ्सवर होणार मोठा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 19:26 IST

Open in App

जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जच्या संघाने २०० पारची लढाई जिंकली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्जच्या संघाने या मैदानात आयपीएलमधील सर्वोच्च २१९ धावसंख्या उभारत  राजस्थानसमोर २०२० धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थानच्या सलामी जोडीनं धमाकेदार सुरुवात केली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

ध्रुव जुरेलनं वाढवलं होतं पंजाबचं टेन्शन, पण शेवटी मिळाला मोठा दिलासा

पंजाब किंग्जच्या संघाने ठेवलेल्या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल ५० (२५) आणि वैभव सूर्यवंशी ४० (१५) यांनी संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली. त्यानंतर ध्रुव जुरेलच्या अर्धशतकी खेळीनं पंजाबचे टेन्शन वाढवले होते. पण तो अर्धशतक करून माघारी फिरला अन् पंजाबसाठी या सामन्यातील विजयासह प्लेऑफ्सचा पेपरही सोपा झाला. १२ सामन्यानंतर पंजाबच्या खात्यात आता १७ गुण जमा झाले आहेत. आता सर्वांच्या नजरा गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील निकालावर असतील.  

IPL 2025 : फक्त ६ जणांनी गाठलाय ५०० धावसंख्येचा पल्ला; त्यात GT च्या तिघांचा दबदबा

गुजरातच्या विजयासह एकाच वेळी तीन संघ प्लेऑफ्ससाठी ठरतील पात्र

गुजरातच्या संघाने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा सामना जिंकला तर गुजरात टायटन्सचा संघ १८ गुणांसह प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारणारा पहिला संघ ठरेल. एवढेच नाही त्यांच्या विजयासह पंजाब किंग्जसह आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघही प्रत्येकी १७-१७ गुणांसह प्लेऑफ्ससाठी पात्र ठरेल. ही परिस्थिती दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौचे टेन्शन वाढवणारी ठरेल. लखनौला तर १७ गुणांपर्यंत पोहचण्याची संधी नसल्यामुळे ते प्लेऑफ्सच्या शर्यतीतूनच बाहेर पडतील. 

पंजाबकडून गोलंदाजीत हरप्रीत ब्रारचा जलवा

पंजाबच्या संघाने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना नेहल वढेराने ३७ चेंडूत ७० धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर अखेरच्या षटकात शशांक सिंह याने ३० चेंडूत ५९ धावा करत संघाच्या धावफलकावर २१९ धावा लावल्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ निर्धारित २० षटकात २०९ धावांपर्यंतच मजल मारू शकला.  पंजाबकडून गोलंदाजीत हरप्रीत ब्रारने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय ओमरझाई आणि मार्को यान्सेन यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.

 

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५पंजाब किंग्सराजस्थान रॉयल्सइंडियन प्रीमिअर लीग