Vaibhav Suryavanshi meets Preity Zinta video, IPL 2025 PBKS vs RR: पंजाब किंग्ज संघाने रविवारी दुपारच्या सामन्यात विजय मिळवला आणि रात्री गुजरातच्या विजयासह प्लेऑफ्सचे स्थान पक्के केले. प्रथम फलंदाजी करताना नेहाल वढेराच्या ७०, शशांक सिंगच्या नाबाद ५९ आणि श्रेयस अय्यरच्या ३० धावांच्या जोरावर पंजाबने २१९ धावांचा पल्ला गाठला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना, राजस्थानचा संघ १० धावांनी तोकडा पडला. राजस्थानने अप्रतिम सुरुवात केली होती. १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने धडाकेबाज फलंदाजी करत १५ चेंडूत ४० धावा कुटल्या. पण त्याचा संघ विजयी होऊ शकला नाही. असे असले तरीही वैभवच्या खेळीचे साऱ्यांनी कौतुक केले. प्रतिस्पर्धी संघाची मालकीण बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने वैभवचे भेट घेतले आणि विशेष कौतुक केले.
प्रितीने वैभवला मारली 'जादू की झप्पी'
पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने यशस्वी जैस्वालसह दमदार सलामी दिली. वैभव सूर्यवंशीने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक फलंदाजी केली. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेटही २६६.६६ होता. त्याने धावून एकही धाव घेतली नाही. सामन्यानंतर, प्रीती झिंटा वैभव सूर्यवंशीला भेटली. त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यादरम्यान प्रीती झिंटा वैभव सूर्यवंशीचे कौतुक करताना दिसली आणि त्याला मिठीही मारली.
----
----
वैभव सूर्यवंशीची IPL मधील कामगिरी
वैभवने राजस्थानकडून सलामीला उतरून ६ सामन्यात १९५ धावा केल्या आहेत. वैभवने २१९ च्या स्ट्राईक रेटने तुफान फटकेबाजी केली आहे. त्याच्या २०० पेक्षाही कमी धावांमध्ये १४ चौकार आणि तब्बल २० षटकारांचा समावेश करण्यात आला आहे. यात एका शतकाचाही समावेश आहे.
Web Title: IPL 2025 Preity Zinta meets hugs Vaibhav Suryavanshi gave special praise video viral pbks vs rr
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.