PBSK vs CSK 22nd Match Priyansh Arya Maiden IPL Century : पंजाबच्या ताफ्यातील युवा डावखुऱा फलंदाज प्रियांश आर्य याने चेन्नई विरुद्ध शतकी खेळीसह नवा इतिहास रचला आहे. श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर पंजाबच्या संघाची सुरुवात खराब झाली. ठराविक अंतराने एका बाजूनं विकेट पडत असताना युवा सलामीवीराने तोऱ्यात फटकेबाजी करत ३९ चेंडूत शतक पूर्ण केले. सनरायझर्स हैदराबादच्या इशान किशननंतर यंदाच्या हंगामात शतकी खेळी करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय फलंदाजाच्या भात्यातून आलेले दुसरे जलद शतक
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय खेळाडूच्या भात्यातून आलेली ही दुसरी जलद शतकी खेळी ठरली. भारताकडून आयपीएलमध्ये सर्वात जलद शतकी खेळीचा विक्रम हा युसूफ पठाणच्या नावे आहे. त्याने ३७ चेंडूत आयपीएलमध्ये शतक झळकावले होते. प्रियांश आर्य हा पंजाब किंग्जच्या फ्रँयायझी संघाडून सर्वात जलद शतक झळकवणारा दुसरा फलंदाजही ठरलाय. याआधी २०१३ मध्ये डेविड मिलरनं या फ्रँचायाझी संघाकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ३८ चेंडूत शतक झळकावले होते. अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत सर्वात जलद शतकी खेळी करण्याचा विक्रम आता प्रियांशच्या नावे झाला आहे.
KKR vs LSG : मॅच आधी आयडॉलची भेट; मग त्याची विकेट घेत पुन्हा नोटबूक स्टाइल सेलिब्रेशन (VIDEO)
गेलच्या नावे आहे IPL मध्ये सर्वात जलद शतकी खेळीचा रेकॉर्ड
आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकवण्याचा विक्रम हा कॅरेबियन स्टार ख्रिस गेलच्या नावे आहे. त्याने २०१३ च्या हंगामात पुणे वॉरियर्स इंडिया संघाविरुद्ध ३० चेंडूत शतक पूर्ण केले होते. पदार्पणाच्या हंगामातच प्रियांश आर्य सर्वात जलदगतीने शतक साजरे करणाऱ्या एलिट क्लबमध्ये सामील झालाय. ३९ चेंडूत शतक झळकवणाऱ्या प्रियांश आर्यनं चेन्नई विरुद्धच्या सामन्यात ४२ चेंडूत ७ चौकार आणि ९ षटकाराच्या मदतीने १०३ धावांची दमदार खेळी केली.
आयपीएलमध्ये सर्वात जलद शतकी खेळी करणारे फलंदाज
३० - ख्रिस गेल (आरसीबी) विरुद्ध पुणे वॉरियर्स, बंगळुरू, २०१३३७ - युसूफ पठाण (आरआर) विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुंबई, २०१०३८ - डेविड मिलर (पंजाब) विरुद्ध आरसीबी, मोहाली, २०१३३९ - ट्रॅविस हेड (हैदराबाद) विरुद्ध आरसीबी, बंगळुरू, २०२४३९ - प्रियांश आर्य (पंजाब) विरुद्ध सीएसके, मुल्लापूर, २०२५