IPL 2025 PBKS vs RR Jofra Archer Sleeping In Dressing Room Come Bowling Take 2 Wickets In First Over : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील १८ व्या सामन्यात पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल आणि संजूनं संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. संजू चांगली सुरुवात करून देऊन तंबूत परतल्यावर यशस्वी जैस्वालनं यंदाच्या हंगामात आपले पहिले अर्धशतक झळकावले. रियान परागनेही उपयुक्त खेळी केली. एका बाजूला २०० पार धावांचे टार्गेट सेट केलेल्या राजस्थानच्या बॅटरची चर्चा रंगत असताना या ताफ्यातील जोफ्रा आर्चर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला. संघाची बॅटिंग सुरु असताना तो ड्रेसिंग रुममध्ये झोप काढताना दिसले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ड्रेसिंग रुममध्ये निवांत झोप काढताना स्पॉट झाला जोफ्रा आर्चर
राजस्थान रॉयल्सची बॅटिंग सुरु असताना या ताफ्यातील इंग्लंडचा स्टार गोलंदाज अचानक ट्रेंडमध्ये आला. यामागचं कारण संघाची बॅटिंग सुरु असताना तो ड्रेसिंग रुममध्ये आराम करताना दिसला. राजस्थानच्या डावातील १४ व्या षटकात यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग बॅटिंग करत असताना जोफ्रा ड्रेसिंग रुममध्ये निवांत झोप काढताना दिसून आले. त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. मग ड्रेसिंग रुममधून झोप काढून आल्यावर पहिल्याच षटकात त्याने पंजाब किंग्जची झोप उडवल्याचे पाहायला मिळाले.
IPL 2025 PBKS vs RR : IPL 2025 : संजूनं केली पांड्यासारखी अशोभनीय कृती; OUT झाल्यावर बॅटवर काढला राग
तो मैदानात आला अन् पहिल्या षटकात दोन विकेट्स घेत उडवली पंजाब किंग्जची झोप
एका बाजूला सोशल मीडियावर जोफ्रा आर्चरचे ड्रेसिंग रुममध्ये निवांत झोप घेतानाचे फोटो व्हायरल होत असताना दुसऱ्या बाजूला तो गोलंदाजीवेळी मैदानात उतरला. एवढेच नाही तर पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने पंजाब किंग्जचा सलामीवीर प्रियंश आर्य याचा त्रिफळा उडवला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या श्रेयस अय्यरनं खणखणीत चौकार मारून खाते उघडले. या षटकात अय्यरनं तिसरा चेंडू निर्धाव खेळल्यावर चौथ्या चेंडूवर पुन्हा चौकार मारला. मग जोफ्रानं एक वाइड बॉल टाकल्यावर कमबॅक करत श्रेयस अय्यरलाही बोल्ड उडवला. झोप काढून येऊन त्याने पंजाबची झोपच उडवली.
Web Title: IPL 2025 PBKS vs RR Rajasthan Royals Team Batting Jofra Archer Sleeping In Dressing Room Come Bowling And Gets Wicket first Ball Priyansh Arya Same Over He Bold Shreyas Iyer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.