IPL 2025 PBKS vs RR : IPL 2025 : संजूनं केली पांड्यासारखी अशोभनीय कृती; OUT झाल्यावर बॅटवर काढला राग

संजू आधी हार्दिक पांड्यानं काढला होता बॅटवर राग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 21:26 IST2025-04-05T21:17:13+5:302025-04-05T21:26:22+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 PBKS vs RR Captain Sanju Samson Throws His Bat In Anger After Getting Out Same Like Hardik Pandya throws the Bat in Frustration Against LSG | IPL 2025 PBKS vs RR : IPL 2025 : संजूनं केली पांड्यासारखी अशोभनीय कृती; OUT झाल्यावर बॅटवर काढला राग

IPL 2025 PBKS vs RR : IPL 2025 : संजूनं केली पांड्यासारखी अशोभनीय कृती; OUT झाल्यावर बॅटवर काढला राग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 PBKS vs  RR Captain Sanju Samson Throws His Bat In Anger After Getting Out : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील १८ व्या सामन्यात संजू सॅमसन कॅप्टनच्या रुपात मैदानात उतरला. पंजाब विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालसोबत त्याने संघाला दमदार सुरुवातही करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी रचली. ही जोडी  लॉकी फर्ग्युसन याने फोडली. विकेट गमावल्यावर संजूनं जे केलं ते पटण्याजोगे नव्हते. त्याने आउट झाल्याचा राग बॅटवर काढला. बॅट फेकल्याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

द्रविडच्या सानिध्यात असलेल्या संजूला हे शोभते का? 

राजस्थानच्या डावातील ११ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर लॉकी फर्ग्युसन याने श्रेयस अय्यरकरवी संजूला झेलबाद केले. २६ चेंडूचा सामना करून ३८ धावांवर त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला. पॅव्हेलियनमध्ये परतत असताना संजून रागाच्या भरात बॅट फेकली. संजू सॅमसन मैदानात असा राग काढताना दिसत नाही. त्यात तो द्रविडसारख्या मार्गदर्शनाखाली खेळतोय. त्यामुळे त्याने पांड्यासारखा तोरा दाखून केलेला आगाऊपणा पडण्याजोगा नव्हता. 

Video: पत्रकार परिषदेत वाजला फोन, कॉल उचलून LSG कोच म्हणाला- "रात्रीचे १२ वाजलेत..."

हार्दिक पांड्याने LSG विरुद्धच्या सामन्यात केली होती अशीच काहीशी कृती

शुक्रवारी, ४ मार्चला लखनौच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या  सामन्यात धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेरच्या षटकात पांड्याच्या भात्यातून फटकेबाजी झाली नाही. या नैराश्यातून हार्दिक पांड्याने बॅट फेकल्याचा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले होते. 

पांड्या असो वा संजू ही कृती अयोग्यच, सचिन तेंडुलकरनं दिला होता यासंदर्भातील मंत्र

बऱ्याचदा क्रिकेटर आपल्या अपयशाचा राग हा बॅटवर काढतात. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने यासंदर्भात क्रिकेटर्संना खास सल्लाही दिला होता.  क्रिकेटरला नेहमी आपल्या किटचा सन्मान केला पाहिजे. कारण त्या गोष्टीमुळे आपण मोठे होते, अशा आशयाचे वक्तव्य मास्टर ब्लास्टनं अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमात केल्याचे पाहायला मिळाले होते.  

Web Title: IPL 2025 PBKS vs RR Captain Sanju Samson Throws His Bat In Anger After Getting Out Same Like Hardik Pandya throws the Bat in Frustration Against LSG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.