Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2025 Qualifier 1 : पावरप्लेमध्ये RCB कडून यश दयालसह भुवीचा जलवा! PBKS ची हिट जोडी ठरली फ्लॉप

पंजाब किंग्जची सुपर हिट जोडी ठरली प्लॉप, यश दयाल पाठोपाठ भुवीचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 20:17 IST

Open in App

आयपीएलच्या १८ व्या हंगामातील क्वालिफायर १ च्या लढतीत पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन संघ  चंडीगडच्या मुल्लानपूरच्या मैदानात उतरले आहेत. या सामन्यात RCB चा कर्णधार रजत पाटीदार याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यश दयाल अन् अनुभवी भुवनेश्वर कूमार या जोडीनं आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवर संघाला दमदार सुरुवात करून दिल्याचे पाहायला मिळाले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

यश दयालनं आपल्या पहिल्याच षटकात घेतली विकेट 

पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रियांश आर्य आणि प्रभसमिरन सिंग या जोडीनं पंजाब किंग्जच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी भुवनेश्वरच्या पहिल्या षटकात ८ धावा घेतल्या. पंजाबच्या डावातील दुसऱ्या षटकात यश दयाल गोलंदाजीला आला. या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर त्याने प्रियांश आर्य याची विेकेट घेत संघाला पहिले यश मिळवून दिले. प्रियांश आर्य ७ धावांवर क्रुणाल पांड्याच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. या विकेटनंतर विराट कोहलीने आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केल्याचेही पाहायला मिळाले.

जो संघ Qualifier 1 खेळलाय तोच चॅम्पियन ठरल्याचा इतिहास! एक अपवाद त्यात RCB ला पराभवाचा टॅग 

भुवीनं प्रभसिमरनचा खेळ केला खल्लास 

पहिली विकेट गमावल्यावर पंजाबच्या संघाला प्रभसिमरन सिंगकडून कडक खेळीची अपेक्षा होती. त्याने यंदाच्या हंगामात ५०० धावसंख्येचा आकडाही गाठला. शॉन मार्श (२००८, २०११), ग्लेन मॅक्सवेल (२०१४), केएल राहुल (२०१८, २०१९, २०२० आणि २०२१) आणि कर्णधार श्रेयस अय्यरनंतर (२०२५) पंजाबकडून एका हंगामात ५०० पेक्षा अधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला. पण तोही  एक चुकीचा फटका खेळून भुवीच्या जाळ्यात फसला. तिसऱ्या षटकात २७ धावांवर पंजाबच्या संघाने प्रभसिमरनच्या रुपात दुसरी विकेट गमावली.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपंजाब किंग्सइंडियन प्रीमिअर लीग