IPL 2025 : 'स्पीड' कमी.. पण अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करण्याची हमी!

जाणून घेऊयात काय आहे या गोलंदाजाची खासियत अन्  पंजाबसाठी तो कसा ठरू शकतो ट्रम्प कार्ड यासंदर्भातील खास माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 12:36 IST2025-04-20T12:32:36+5:302025-04-20T12:36:20+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 PBKS vs RCB 37th Match Lokmat Player to Watch Xavier Bartlett Punjab Kings | IPL 2025 : 'स्पीड' कमी.. पण अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करण्याची हमी!

IPL 2025 : 'स्पीड' कमी.. पण अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करण्याची हमी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 PBKS vs RCB 37th Match Player to Watch Xavier Bartlett Punjab Kings : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वात वेगवान चेंडू फेकणारा लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झालाय. पंजाबकडून खेळताना लखनौ विरुद्धच्या सामन्यात लॉकीनं १५३.२ kph वेगाने चेंडू टाकला होता. लॉकी फर्ग्युसन हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलदगतीने गोलंदाजी करणाऱ्यांपैकी एक आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात शॉन टेटनंतर (१५७.७ kph) सर्वात फास्ट चेंडू टाकण्याचा रेकॉर्ड हा लॉकी फर्ग्युसन (१५७.३ kph) याच्या नावे आहे. या गोलंदाजाची कमी भरून काढण्यासाठी पंजाबच्या संघाने स्वस्तात मस्त झेवियर बार्टलेट (Xavier Bartlett ) याच्यावर डाव खेळलाय. लॉकीच्या जागी पंजाबने ज्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला पसंती दिलीयेत तो काही फार जलदगतीने गोलंदाजी करत नाही. त्यामुळे हा सौदा खरंच संघासाठी फायद्याचा ठरेल का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो. जाणून घेऊयात काय आहे या गोलंदाजाची खासियत अन्  पंजाबसाठी तो कसा ठरू शकतो ट्रम्प कार्ड यासंदर्भातील खास माहिती 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

तो एक मध्यम जलदगती गोलंदाज, वेग किती माहितीये?

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर हा एक मध्यम जलदगती गोलंदाज आहे. तो जवळपास १३० kph वेगाने गोलंदाजी करतो. लॉकी फर्ग्युसनच्या तुलनेत तो खूप मागे आहे. पण स्पीड कमी असले तरी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांचा 'करेक्ट कार्यक्रम' करण्याची हमी त्याच्या गोलंदाजीत दिसून येते. अनपेक्षित बाउन्सरसह तो फलंदाजांसाठी चॅलेंज निर्माण करू शकतो. ऑस्ट्रेलियन दिग्गज ग्लेन मॅकग्राप्रमाणेच तो सातत्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे.  त्यामुळेच तो पंजाबसाठी एक ट्रम्प कार्ड ठरू शकतो.

IPL 2025 : RCB चा निम्मा प्रवास झाला; त्यात तो फक्त एक फिफ्टी मारुन दमला अन् 'तलवार म्यान' करून बसला!

IPL पदार्पणा आधी BBL मध्ये जलवा

झेवियर बार्टलेट याने ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या बिग बॅश लीगमध्ये कमालीची कामगिरी करून सर्वांचे लक्षवेधून घेतले होते. २०२३-२४ च्या हंगामात त्याने ११ सामन्यात २० विकेट्स घेतल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर त्याने ऑस्ट्रेलियन संघातही एन्ट्री मारल्याचे पाहायला मिळाले. आता त्याला आयपीएल गाजवण्याची संधी मिळाली आहे.

पंजाबनं या गोलंदाजासाठी किती रुपये मोजलेत?

पंजाब किंग्जच्या संघाने आयपीएलच्या मेगा लिलावात ८० लाख रुपये मोजून त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यातून त्याने पंजाबकडून पदार्पणाचा सामना खेळला. या सामन्यात ३ षटकात ३० धावा खर्च करत त्याने एक विकेट घेतली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यातही त्याने एवढ्याच षटकात २६ धावा खर्च करत १ विकेट घेतली होती. उर्वरित सामन्यात त्याला किती संधी मिळणार अन् तो कामगिरी उंचावण्याचा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.
 

Web Title: IPL 2025 PBKS vs RCB 37th Match Lokmat Player to Watch Xavier Bartlett Punjab Kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.