PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'

पंजाबच्या संघाने दिमाखात जिंकला सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 23:56 IST2025-05-04T23:55:04+5:302025-05-04T23:56:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 PBKS vs LSG Punjab Kings Beats Lucknow Super Giants By 37 Runs | PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'

PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमियर लीगच्या ५५ व्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जच्या संघाने  पंतच्या लखनौच्या संघाला पराभूत करत प्लेऑफ्सच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकले आहे. या सामन्यात बॅटिंग-बॉलिंगमध्ये पंजाबकडून सिंग इज किंग शो पाहायला मिळाला. आधी फलंदाजी करताना प्रभसिमरन सिंगने धमाका केला. त्यानंतर धावांचा बचाव करताना अर्शदीप सिंगने लखनौच्या फलंदाजीला सुरुंग लावला. दोन सिंगच्या दमदार कामगिरीच्या जोरावर पंजाबच्या संघाने लखनौच्या संघाला ३७ धावांनी पराभूत केले. या विजयासह   १५ गुणांसह पंजाबचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

बडोनी एकटा पडला,  मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना लखनौचा संघ कमी पडला  

घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्जच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात २३६ धावा करत लखनौच्या संघासमोर ३३७ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना लखनौचा संघ निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १९९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. आयुष बडोनीचे दमदार अर्धशतक सोडले तर अन्य कुणालाही मोठी खेळी करता आली नाही.

KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...

प्रभसिमरन सिंगची ९१ धावांची खेळी

पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाबच्या संघाने प्रियांश आर्यच्या रुपात अगदी सुरुवातीलाच पहिली विकेट गमावली. तो फक्त एक धाव करून माघारी फिरला. त्यानंतर जॉश इंग्लिसच्या साथीनं प्रभसिमरन सिंगनं संघाचा डाव पुढे नेला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची खेळी केली. प्रियांशची विकेट घेणाऱ्या आकाश सिंह यानेच इंग्लिसलाही चालते केले. तो ३० धावा करून माघारी फिरला. ५० धावांवर पंजाबच्या संघाने दुसरी विकेट गमावली होती. त्यानंतर प्रभसिमरन अन् श्रेयस अय्यर जोडी जमली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी  ७८ धावा केल्या. अय्यर २५ चेंडूत ४५ धावा करून बाद झाला. प्रभसिमरन सिंंग ९१ धावांवर बाद झाला. अखेरच्या षटकात शशांक सिंग याने केलेली ३३ धावांची नाबाद खेळी आणि स्टॉयनीसच्या नाबाद १५ धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाबच्या संघाने धावफलकावर २३६ धावा लावल्या. लखनौकडून दिग्वेश राठी आणि आकाश सिंह यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.

आयुष बडोनीची दमदार खेळी ठरली व्यर्थ

धावांचा पाठलाग करताना मिचेल मार्श खातेही न उघडता माघारी फिरला. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या एडन मार्करम १३ तर निकोल पूरन ६ धावांवर माघारी फिरला. रिषभ पंतने दुहेरी आकडा गाठला. पण त्याची खेळी १८ धावांवरच संपुष्टात आली.  लखनौच्या संघाने ५८ धावांवर आघाडीच्या ४ विकेट्स गमावल्या होत्या. अब्दुल समदने २४ चेंडूत केलेल्या ४५ धावा आणि आयुष बडोनीच्या ४० चेंडूतील ७४ धावांच्या खेळी केली. पण अन्य फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे लखनौच्या संघावर पराभवाची नामुष्की ओढावली. पंजाबकडून अर्शदीप सिंगनं ४ षटकात १६ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या. 

Web Title: IPL 2025 PBKS vs LSG Punjab Kings Beats Lucknow Super Giants By 37 Runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.