Join us

IPL 2025: 'असंभव....'; चहलच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीनंतर RJ महावशची इन्स्टा स्टोरी अन् खास मेसेज 

RJ Mahvash Yuzvendra Chahal, IPL 2025 PBKS vs KKR: घटस्फोटानंतर चहल आणि महावश यांच्यात लव्ह अफेअर असल्याच्या चर्चा सुरु आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:47 IST

Open in App

RJ Mahvash Yuzvendra Chahal, IPL 2025 PBKS vs KKR: गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ कोलकाता नाइट रायडर्स मंगळवारी अतिशय वाईट पद्धतीने पराभूत झाला. पंजाब किंग्ज संघाने अवघ्या १११ धावांचा बचाव करताना तब्बल १५ धावांनी चित्तथरारक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबची फलंदाजी ढेपाळली. प्रभसिमरन सिंग (३०), प्रियांश आर्य (२२) आणि शशांक सिंग (१८) यांच्या संघर्षपूर्ण खेळीच्या जोरावर पंजाबने १११ धावांचा पल्ला गाठला. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात उत्तम झाली. अंगक्रिश रघुवंशीने ३७ धावांची उत्तम खेळी केली. पण ३ बाद ७२ वरून कोलकाताचा डाव कोलमडला आणि ९५ धावांवर आटोपला. युजवेंद्र चहलने २८ धावांत ४ बळी घेत सामना फिरवला. या विजयानंतर साऱ्यांनीच चहलचे कौतुक केले. त्यात त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड आरजे महावशचाही समावेश दिसला.

आरजे महावशची चहलसाठी खास इन्स्टा स्टोरी

कोलकाताच्या डावाची सुरुवात उत्तम झाली होती. ७२ धावांवर त्यांचे ३ गडी बाद झाले होते. कोलकाता हा सामना सहज जिंकेल अशी स्थिती होती. त्याच वेळी युजवेंद्र चहल आणि  ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी फिरकीच्या जोरावर सामना फिरवला. चहलने अप्रतिम फिरकी गोलंदाजी करत ४ बळी घेतले. त्याने अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी हे दोन सेट फलंदाज बाद केले. त्यानंतर रिंकू सिंग आणि रमणदीप सिंग यांनाही माघारी धाडले. त्यामुळे सामन्याचा निकाल फिरला. त्याच्या याच दमदार गोलंदाजीचे महावशनेही कौतुक केले. ती चहलला अतिशय प्रतिभावान क्रिकेटर म्हणाली. तसेच IPL मधील सर्वाधिक बळी घेणारा चहल नक्कीच खास आहे असे म्हणाली. अंसभव गोष्टी सत्यात आणणारा म्हणत तिने चहलची स्तुती केली.

प्रिती झिंटाही युजवेंद्र चहलवर खुश

या विजयानंतर प्रीती झिंटाला झालेला आनंद बघण्याजोगा होता. स्टँडमध्ये बसलेली प्रीती झिंटा प्रत्येक विकेटनंतर उत्साहाने  संघाला चीअर करताना दिसली. या ऐतिहासिक विजयानंतर प्रिती झिंटा मैदानात आली. मॅचचा हिरो ठरलेल्या चहलला ती भेटली. त्याच्याशी गप्पा गोष्टी केल्या अन् गळाभेट घेत घेऊन कौतुकाने त्याची पाठ थोपटली. चहलशिवाय तिने कोच रिकी पाँटिंगचेही कौतुक केले.

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५युजवेंद्र चहलपंजाब किंग्सकोलकाता नाईट रायडर्स