Join us

IPL 2025: "पराभवास मीच जबाबदार, मी चुकीचा शॉट खेळलो"; अजिंक्य रहाणे पराभवानंतर निराश

Ajinkya Rahane, IPL 2025 PBKS vs KKR: ३ बाद ७२ वरून कोलकाताचा संघ ९५ धावांवर 'ऑलआऊट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 09:32 IST

Open in App

Ajinkya Rahane, IPL 2025 PBKS vs KKR:  'मी स्वतः चुकीचा फटका मारला. या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो,' अशी कबुली कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर दिली. ११२ धावांच्या लक्ष्याचा अयशस्वी पाठलाग है फलंदाजांचे सामूहिक अपयश असून, फटक्यांची निवड करताना आम्ही चुकलोच. आमच्या फलंदाजांमध्ये 'क्रिकेट सेन्स' अर्थात परिस्थितीनुसार खेळण्याची जाणीव दिसली नाही. टी-२० प्रकारात स्ट्राइक रोटेशन हे षटकार मारण्याइतकेच महत्त्वाचे आहे, याची आठवण रहाणेने सहकाऱ्यांना करून दिली.

रोमांचक सामन्यात १६ धावांनी झालेल्या पराभवामुळे कोलकाता सात सामन्यांनंतर गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. खेळपट्टीबाबत रहाणे म्हणाला, 'ही खेळपट्टी पाटा नव्हती. गोलंदाजांना बरीच मदत झाली. आम्ही आव्हानांचा भक्कमपणे सामना करायला हवा होता. टी-२०मध्ये निर्धाव घटक गेले तरी नुकसान होत नाही. परिस्थितीनुसार ७०-८०चा स्ट्राइक रेट वाईट नसतो. सध्या प्रत्येक चेंडूवर फलंदाज मोठे फटके मारण्याच्या पवित्र्यात असतो. मैदानावर स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा हा प्रकार आहे. पण, टी-२० सामने अशाप्रकारे जिंकता येत नाही. त्यासाठी परिस्थितीचे आकलन होणे आवश्यक आहे.'

'विचारमंथनाची गरज'

पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, असे सांगून रहाणेने पुढच्या सामन्यात सुधारणा करण्याची ग्वाही दिली. तो म्हणाला, 'कर्णधार म्हणून पराभवास भी जबाबदार आहे. पण, वैयक्तिकदृष्टचा खात्री आहे की, सहकारी खेळाडू विचारमंथन करतील आणि सुधारणा घडवून आणतील.

विजयाचे श्रेय गोलंदाजांना : वढेरा

पंजाबचा फलंदाज नेहल वढेरा याने विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले. युझवेंद्र चहल, 'अर्शदीपसिंग, मार्को यान्सेन आणि पहिला सामना खेळलेला जेव्हियर बार्टलेट यांनी प्रशंसनीय मारा केला. फलंदाजांच्या चुकांची भरपाई गोलंदाजांनी केली, असे तो म्हणाला.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५अजिंक्य रहाणेकोलकाता नाईट रायडर्सपंजाब किंग्स