Join us

IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?

पंजाब किंग्जच्या डावातील १० षटकानंतर थांबवण्यात आला सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 21:48 IST

Open in App

पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना धर्मशाला येथील मैदानात खेळवण्यात येत आहे. पावसाच्या व्यत्ययानंतर एक तास उशीरा सुरु झालेला सामना तांत्रिक अडचणीमुळे थांबवण्यात आला.  पंजाबच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १०. १ षटकात १२२ धावा केल्या होत्या. फ्लड लाइटमधील तांत्रिक बिघाडामुळे सामना थांबवण्यात आल्याची माहिती पहिल्यांदा देण्यात आली. त्यानंतर सामना  सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.  नेमकं कारण काय ते स्पष्ट करण्यात आलेले नाही. पण हा सामना थांबवण्यामागे भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीत असावी, अशी माहिती समोर येत आहे.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५